
आज मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) 1033 रुग्णांची व 39 मृत्यूची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईमधील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या वाढून 1,10,129 झाली आहे. आज शहरामध्ये 1706 रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 81,944 रूग्ण बरे झाले आहेत. शहरामध्ये आतापर्यंत एकूण 6129 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज मुंबईमध्ये 859 कोरोना व्हायरस संशयित रुग्णांची भर्ती झाली आहे. सध्या शहरामध्ये 21,812 सक्रीय रुग्णांवर उपचार चालू आहेत. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली.
आज मृत्यू झालेल्या 23 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यातील 24 रुग्ण पुरुष व 15 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 1 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 26 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 12 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 73 टक्के झाला आहे. 20 जुलै ते 26 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.03 टक्के राहिला आहे. 26 जुलै 2020 पर्यंत मुंबईमध्ये झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 4,85,563 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर आता 68 दिवस झाला आहे. (हेही वाचा: मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 9 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2,540 वर पोहचला, महापालिकेची माहिती)
एएनआय ट्वीट -
1,033 #COVID19 cases and 39 deaths reported in Mumbai today; 1,706 patients recovered and discharged. Total positive cases rise to 1,10,129 including 81,944 patients recovered and discharged & 6129 deaths: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/ZU0q3jWzqt
— ANI (@ANI) July 27, 2020
सध्या मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) यांची संख्या 636 इतकी असून, सक्रिय सीलबंद इमारती 6048 आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुंबई, कोलकाता आणि नोएडा या तीन शहरांमध्ये कोरोना व्हायरस टेस्टिंगसाठी तीन हाय-टेक लॅबचे उद्घाटन केले. भविष्यात, या प्रयोगशाळांमध्ये हिपॅटायटीस बी आणि सी, एचआयव्ही, डेंग्यू यासह अनेक आजारांच्या तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.