पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) बस आणि ट्रकची जोरदार धडक (Road Accident) झाली आहे. दरम्यान, एका जणाला आपला जीव गमवावा लागला असून 3 जण जखमी झाले आहेत. ही घटना आज बुधवारी 4:30 च्या सुमारास घडली. या अपघाताला बस चालक जबाबदार असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अपघातग्रस्त बस साक्री धुळे आगार येथून पुण्याच्या दिशेने जात असताना ही दुर्देवी घटना घडली.
पुणे-नाशिक या महामार्गावर एसटी बस चालकाने भरघाव वेगात रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यात एसटीच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. तसेच या अपघातात एसटीच्या एका प्रवाशाला त्याचा जीव गमवावा लागला आहे. तर, 3 जण झखमी झाले आहेत. या अपघाताला एसटी वाहन चालकच जबाबदार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे स्थानिक पोलिसांनी एसटी बस चालकाला ताब्यात घेतले. हे देखील वाचा-कोल्हापूर: बाइक आणि टेम्पो च्या धडकीने भीषण अपघात; 3 जण ठार