डॉक्टरांची लेखीभाषा का सहज कळून येत नाही? जाणून घ्या त्या मागील कारण
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

जेव्हा तुम्ही आजारी पडता त्यावेळी आपण डॉक्टरांकडे उपचारासाठी जातो. तर डॉक्टरांकडून रुग्णाची तपासणी केल्यानंतर त्या आजारावर औषधे लिहून दिली जातात. मात्र डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची लेखीभाषा हे सहज कळून येत नाही. त्यामुळे नेमके कोणते औषध आहे हे समजण्यास थोडा गोंधळच होतो. तर तुम्हाला माहिती आहे का डॉक्टरांची लेखीभाषा का सहज कळून येत नाही. त्यामागील नेमके कारण काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डॉक्टरांकडे दिवसभर विविध आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने येतात. त्यावेळी प्रत्येकाच्या आजाराचे निवारण होण्यासाठी त्यांना त्यावरील औषध लिहून देतात. त्यामुळेच रुग्णाच्या आजाराबाबात अधिक माहिती लिहिण्यापेक्षा ते औषधांच्या भाषेत त्यांची लेखी असते. त्यावरुन डॉक्टरांना पुढील वेळेस कोणत्या रुग्णाला कोणत्या आजारांसाठी औषध दिले आहे हे समजणे सोपे होते. तर रुग्णाच्या आजारावरचे निदान करण्यासाठी डॉक्टरांना त्याबाबत अधिक माहिती समजून घेऊन औषध देणे हे काही सोपे काम नव्हे. तसेच रुग्णांची संख्या अधिक होत असल्याने डॉक्टर त्यांची लेखीभाषा अधिक वेगाने लिहित असल्याने त्यांचे लिहणे काही वेळेस समजून न येण्यामागील दुसरे कारण ठरु शकते.(Health Tips: काळा चहा पिणे या '6' आजारांवर आहे गुणकारी उपाय)

डॉक्टरांच्या मेडिकल शब्दभांडार सुद्धा त्यांच्या खराब लिखाणासाठी कारणीभूत आहेत. कारण जर एखाद्या डॉक्टरांना epididymitis आजार असलेल्या रुग्णाला तपासून झाल्यावर त्यावरील औषध द्यायचे झाल्यास स्पेलिंग कशी लिहिली जाईल याचा विचार प्रथम मनात येईल. त्यामुळेच काही विविध मेडिकल शब्दकोश असे आहेत त्यांच्याबाबत अधिक स्पष्टीकरण लिहिल्यास ते रुग्णाला समजण्यास थोडे कठीणच होईल. जरी डॉक्टरांची लेखीभाषा सामान्यांना समजत नसल्यास ती केमिस्ट मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना नक्कीच कळते आणि ते तुम्हाला आजारावरील योग्य औषध देण्यास मदत करतात.