जाणून घ्या वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींकडे का आकर्षित होतात मुले; काय आहेत याचे फायदे?
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Facebook)

आजकाल नात्यांमध्ये वयाचे बंधन हे तितकेसे महत्वाचे ठरत नसताना दिसून येत आहे. दोघांमध्ये प्रेम आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी असेल तर कोणत्याही वयाचे जोडपे खुश राहू शकते. त्यात मुलगी मोठी असेल तर हमखास ते नाते दीर्घ काळापर्यंत टिकून राहते. म्हणूनच अभिषेक-ऐश्वर्या, प्रियंका-निक ही जोडपी आजकाल आदर्श ठरत आहेत. वयाने मोठ्या स्त्रिया मुलांची जास्त काळजी घेतात, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देतात, त्यांच्यावर जास्त प्रेम करतात, सेक्स दरम्यानही त्या पुढाकार घेऊन मुलांचा इच्छा पूर्ण करतात. बहुतांश मुलांना वयाने मोठ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहायला आवडते. सहसा मुले ही गोष्ट ही गोष्ट बोलून दाखवत नाहीत, मात्र हे सत्य आहे. वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींची मॅच्युरिटी मुलांना आवडते. तुम्हीही जर अशा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला असाल तर त्यात काही गैर नाही. मात्र हे का घडते हे जाणून घेण्यासाठी पहा ही कारणे-

आर्थिकदृष्ट्या सक्षम – मुलांना मुलींवर खर्च करायला आवडते, मात्र मुलांप्रमाणे मुलीही आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर दोघे मिळून खर्च विभागू शकतील. आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे मुली इंडिपेंडेंट बनतात आणि पैशांचं योग्य ते महत्व त्यांना कळते, ही गोष्ट मुलांना आवडते.

जबाबदारीची जाणीव – वयाने मोठ्या असलेल्या मुलींना जबाबदारीची जाणीव असते. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे ओळखून, आपल्या गरजा समजून घेऊन त्या पाऊल टाकतात. आपल्या जोडीदाराकडेही त्या असेच लक्ष देतात. याच गोष्टीमुळे वाईट काळाचा सामना मोठ्या वयाच्या मुली जास्त खंबीरपणे करतात. (हेही वाचा : लग्नानंतर सेक्सपेक्षाही जास्त महत्वाच्या आहेत या 5 गोष्टी)

कमी दिखावा – जसे जसे वय वाढते तसे दिखावा करण्याचे प्रमाण कमी होत जाते. वयाने मोठ्या असलेल्या मुलींमध्ये साधे राहणे, कमी मेकअप करणे, स्टायलिश पण सिलेक्टीव्ह गोष्टी घेणे असे बदल होतात. त्यांच्या याच गोष्टी मुलांना अधिक भावतात कारण मुलांना सहसा शोऑफ करणे आवडत नाही.

सेक्समध्ये अनुभवी – सेक्सच्या बाबतीत वयाने मोठ्या असलेल्या मुली फार उतावीळ नसतात. आपल्या जोडीदाराला समजून घेऊन, त्याच्या इच्छेचा विचार करून त्या स्वतः सेक्समध्ये पुढाकार घेतात. हीच गोष्ट मुलांना आवडते, कारण त्यांना गाईड करणारे कोणी हवे असते. तसेच सेक्सच्या बाबतीत मुली जास्त अनुभवी असतात त्यामुळे त्यांना ती नाजूक वेळ कशी हाताळावी हे समजते.  

छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष – जसे जसे वय वाढते तसे तसे सुखाच्या व्याख्या बदलत जातात, तुमच्या आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही तो शोधण्याचा प्रयत्न करता. हीच गोष्ट वयाने मोठ्या असणाऱ्या मुली अतिशय समजूतदारपणे घडवून आणतात. मुलांची काळजी घेणे, गरजा पूर्ण करणे, प्रायव्हसी जपणे, वेळ देणे अशा गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो.

यासोबतच वयाने मोठ्या असणाऱ्या मुली या शांत स्वभावाच्या असतात, सतत कुरबुर करत राहणे त्यांना आवडत नाही. हट्ट करणे, सतत चिकटून राहणे, संशय घेणे अशा सर्व गोष्टी त्यांनी कधीच मागे सोडलेल्या असतात. यामुळे मुलांना वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींचे सानिध्य आवडते.