Uttrakhand: आपल्या जुन्या पिढीबद्दल जाणून घ्यायचे आहे? तुम्हाला तुमचे गोत्र माहिती आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे माहिती होण्यासाठी आता उत्तराखंडच्या सरकारने नवा उपक्रम तेथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी चालू करणार आहे.
जर तुम्ही बाहेर फिरायला जाण्यासाठी ठिकाण शोधत असाल तर उत्तराखंडमध्ये जरूर जा. कारण उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेन्द सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी पर्यटकांसाठी 'गोत्र टूरिझम' (Gotra Tourism नावाचा खास उपक्रम चालू करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांना हिंदू परंपरेनुसार(Hindu Rituals) कश्यप, अत्रि, वशिष्ठ, विश्वकर्मा, गौतम, जमदग्नि आणि भारद्वाज या सप्तऋषींमुळे पर्यावर्णरणाची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले की, हिमालयात (Himalaya) या सप्तऋषींसंबंधित ठिकाणांना पर्यटन विभाग विकसित करणार आहे. तसेच प्रत्येक समाजाच्या गोत्रसाठी विशेष प्रतीक चिन्ह (Symbol) बनविले जाणार आहे. त्यामुळे लोकांना या चिन्ह्यांच्या माध्यमातून आपले गोत्र समजून घेण्यास सोपे होईल.
राज्य पर्यटन विभाग 'बही' (Traveller Record) डिजिटल बनविण्यासाठी एक अभियान योजिले आहे. तसेच तेथील पर्यटकांचा रेकॉर्ड तीर्थ पुरोहितांकडे असतो. त्यातील काही तीर्थ पुरोहित चार धाम- केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे राहतात तर 2500 पुरोहित हे हरिद्वार मध्ये राहतात. तर या पुरोहितांकडे गेली 100 वर्षांपूर्वीपासूनचा लाखो परिवारांची माहिती असल्याचे सांगितले आहे.