स्वीडनचे (Sweden) लोकप्रिय आईस हॉटेल (Ice Hotel) पुन्हा एकदा पर्यटकांसाठी सज्ज झाले आहे. हे हॉटेल दरवर्षी हिवाळ्यात बनविले जाते. यानंतर ते 5 महिन्यांनंतर वितळेल. ही परंपरा 1989 पासून चालू आहे, हॉटेलचे हे 31 वे वर्ष आहे. हे हॉटेल आर्क्टिक सर्कलपासून सुमारे 200 किमी अंतरावर, टॉर्न (Torne) नदीच्या काठावर बांधला गेले आहे. हे हॉटेल बांधण्यासाठी 2500 टन बर्फ टॉर्न नदीमधून जमा केला जातो.
ऑक्टोबरपासून हे हॉटेल बनवण्यास सुरुवात केली जाते, जे बनवण्यासाठी जगभरातून कारागीर जमा होतात. यावेळी येथे 35 शयनकक्ष तयार करण्यात आले आहेत. या सर्व खोल्या बर्फाचे नक्षीदार पडदे आणि रेनडिअर प्रतिकृतींनी सजवलेले आहेत.
या हॉटेलमध्ये एक मोठे सभागृह देखील आहे. येथे बर्फाने बनविलेले 6 बेंच आहेत. खोलीच्या आतील तापमान उणे 5 अंशांच्या आसपास आहे. दरवर्षी 50 हजाराहून अधिक पर्यटक या हॉटेलमध्ये रहाण्यासाठी येतात. मे पर्यंत बर्फ वितळण्यास सुरवात होते. यानंतर हे हॉटेल बंद करण्यात येते. हे हॉटेल पर्यावरणास अनुकूल आहे. येथे ठेवलेली सर्व उपकरणे सौर उर्जेद्वारे चालविली जातात. हॉटेलमध्ये आईस बार देखील आहे. येथील ग्लासही बर्फापासून बनविला जातो. या व्यतिरिक्त फीचर लाइटिंगची सुविधा आहे, यामुळे हॉटेलचा लुक बदलत राहतो. (हेही वाचा: मुंबईच्या गजबजाटापासून थोडे दूर असणारे आरामदायी असे '5' आलिशान रिसॉर्ट्स)
हॉटेलबाहेरचे दृश्यही मनोहर आहे. आतील भाग जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांनी प्रेरित आहे. हॉटेलच्या आत आईस सेरेमनी हॉल आणि मुलांसाठी क्रिएटिव्ह झोन देखील आहे. या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी 17 हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत दर आकारला जातो. यासह स्वीडनच्या लॅपलँडमधील ल्युले नदीवर, तरंगणारे हॉटेल आणि स्पा 'द आर्कटिक बाथ' सुरू झाले आहे. हॉटेल लाकडी फ्लोटिंग मार्ग आणि बोटीमार्गे इथे पोहोचता येते. सध्या ही दोन हॉटेल्स पर्यटकांना खुणावत आहेत.