Supai: जगभरातील देश- विदेशातील पर्यटकांसाठी सध्या गजबजलेले गाव म्हणजे 'सुपाई'. ग्रँड कैनियच्या जवळ हवासू कैनियन येथे सुपाई हे गाव वसलेले आहे. तर जमिखालील रहस्यमय गावाची प्रतिकृती येथे पाहण्याजोगे आहे. तर 3 हजार फुट वसलेले हे गाव सध्या पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळ झाले आहे.
सुपाई येथील लोकसंख्या जवळजवळ 200 एवढी आहे. जमिनीखाली वसलेल्या या गावातील लोकांना 'रेड इंडिन्स' (Red Indians) असे संबोधले जाते म्हणजेच थोडक्यात काय, अमेरिकन (American). जमिनीपासून हजारो फुट खाली असलेले हे गाव इतर गावांपेक्षा वैविध्यपूर्ण आहे. तर येथे पोहणचे मुश्किल आहेच. परंतु येथे येणारे पर्यटक पायी चालत फिरायला जाणे काही सोडत नाही. तसेच दळणवळणाची काही सोय नसल्याने काही पर्यटक हेलिकॉप्टरचा सुद्धा उपयोग करतात. सुपाईमध्ये शहरांसारखे अरुंद रस्त्यांची सोय नसल्याने खडकाळ प्रदेशात आल्यासारखे वाटते. वाटेकरु आणि पर्यटक येथे खेचरांचासुद्धा उपयोग करुन फिरण्याचा मार्ग अवलंबतात.
या सुपाईसारख्या अनोख्या गावाचे सौंदर्य टिपण्यासाठी प्रत्येक वर्षी जगभरातून 55 लाख पर्यटक येतात. तर येथे राहणारी लोक या जागेला 'हवाईसूपाई' असे म्हणतात. तसेच मका आणि शेंगदाण्याची शेती याचे येथे उत्पादन केले जाते. सुपाईमध्ये गावातील घरांव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस, चर्च, शाळा, किराणा मालाचे दुकान आणि कॅफे सुद्धा आहे. मात्र सुपाई येथे अजूनही हाताने लिहिलेली चिठ्ठी ही खेचरांमार्फेत दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहचवली जाते. परंतु गावाचे वेगळेपण हे तेथील असंख्य झरे वेधून घेतात.