Rare White Deer Spotted in UP: उत्तर प्रदेशमध्ये आढळले दुर्मिळ पांढरे हरीण, फोटो व्हायरल
White Deer | Repetitional Photo (PC - Pixabay)

White Deer Viral Photo: पांढऱ्या रंगाचे दुर्मिळ हरीण (Rare White Deer) सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या हरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. भारतीय वन रेंजर्स (Indian Forest Rangers) वन्यजीव आणि वनस्पती आणि प्राण्यांच्या विविधतेमध्ये स्वारस्य असलेल्यांसाठी नेहमीच विविध माहिती, छायात्रिचे, ध्वनिचित्रफिती सामायिक करत असतात. आताही अधिकारी आकाश दीप बधवान (Akash Deep Badhawan) यांनी ट्विटरवर दुर्मिळ अल्बिनो हरणाचे छायाचित्र पोस्ट केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडिया (Social Media) वापरकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि कुतुलहल वाढले आहे.

अधिकारी आकाश दीप बधवान यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, हे पांढरे हरीण उत्तर प्रदेशातील कटारनिया घाट वन्यजीव अभयारण्य येथे आढळून आले. या हरणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील कटारनिया घाट (Katarniya Ghat) येथे हे दुर्मिळ अल्बिनो स्पॉटेड हरण दिसले.

दरम्यान, पांढऱ्या हरणाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काहींनी त्याच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली आहे. @aakashbadhawan ट्विटर हँडलवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. शेअर केल्यापासून, व्हायरल पोस्टला 61,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी हे फोटो शेअरही केले आहेत. (हेही वाचा, Leopard and Cat Video In Nashik: मृत्यूच्या दारात संपलं वैर, बुडत्या मांजराला बिबट्याचा आधार; नाशिक येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

ट्विट

अल्बिनो पांढरे हरण उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियासह जगभरातील विविध प्रदेशांमध्ये आढळतात. काही संस्कृतींमध्ये, ते पवित्र मानले जातात. तसेच त्या संस्कृतींमध्ये ते पवित्रता आणि नशीबाचे प्रतीक म्हणून पूजनीय आहेत. नेटिव्ह अमेरिकन लोककथांमध्ये, पांढरे हरण हे आत्मिक जगाचे संदेशवाहक असल्याचे मानले जाते. त्यांचे स्वरुपाकडे येणा-या महत्त्वपूर्ण बदलांचे लक्षण म्हणून पाहिले जाते.