![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/Untitled-design-1-2-380x214.jpg)
भारतीय रेल्वे (Indian Railway) पुन्हा एकदा ‘रामायण एक्सप्रेस’ (Ramayana Express) सुरू करणार आहे. पूर्वीप्रमाणेच, रेल्वेमधून प्रवाशांना भगवान राम यांच्या जीवनाशी संबंधित पौराणिक ठिकाणांचे दर्शन या रेल्वेद्वारे घडविले जाणार आहे. या रेल्वेचा प्रवास 18 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पूर्वीप्रमाणेच हा संपूर्ण दौरा भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ सांभाळत आहे. आयआरसीटीसीच्या भारत दर्शन पॅकेजचा हा एक भाग असेल. 18 नोव्हेंबर रोजी इंदोर आतून ही गाडी प्रस्थान करेल
रामायण एक्सप्रेसचा मार्ग- रामायण एक्सप्रेस 18 नोव्हेंबर 2019 रोजी इंदोरहून अयोध्या, सीतामढी, जनकपूर, प्रयागराज, चित्रकूट, नाशिक, हंपी, रामेश्वर आणि शेवटी मदुराई मार्गे परत येईल. हा एकूण प्रवास 14 रात्री आणि 15 दिवसांचा असेल यात्रेदरम्यान भगवान राम यांच्याशी संबंधित प्रत्येक सुंदर तीर्थक्षेत्राला भाविक भेट देतील.
या स्थळांना भेटी दिल्या जातील - रामजन्मभूमी, हनुमान गढी, भारत मंदिर, सीता माता मंदिर, तुलसी मानस मंदिर, संकट मोचन मंदिर, सीतामढी, त्रिवेणी संगम, हनुमान मंदिर, भारद्वाज आश्रम, श्रृं श्रृंगी ऋषि मंदिर, रामघाट, सती अनुसुया मंदिर, पंचवटी, अंजनाद्री हिल, हनुमान जन्मस्थान, ज्योतिर्लिंग शिव मंदिर इत्यादी. (हेही वाचा: सुट्टीत गोव्याला जाण्याचा प्लान करत असाल, तर '10' गोष्टींची घ्या विशेष काळजी)
या टूर पॅकेजमध्ये प्रवाश्यांना शुद्ध शाकाहारी भोजन, राहण्यासाठी योग्य जागा, पर्यटक बस, माहितीसाठी टूर एस्कॉर्ट आणि उत्तम सुरक्षा व्यवस्था मिळतील. 18 नोव्हेंबर रोजी ही गाडी इंदूरहून सकाळी 6 वाजता सुटेल. इंदूरहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्टँडर्ड श्रेणीनुसार प्रत्येकी 14,175 रुपये भाडे द्यावे लागेल. त्याचबरोबर कम्फर्ट प्रवर्गासाठी दरडोई 17,325 रुपये भाडे ठेवले आहे. रामायण एक्सप्रेसमध्ये ऑनलाईन सीट बुकिंगसाठी, तुम्ही भारतीय रेल्वे केटरिंग आणि टूरिझम वेबसाइट www.irctctourism.com वर लॉग इन करू शकता.