गेले तीन वर्षांपासून माथेरान नेरळ मिनी ट्रेन (Matheran Neral Mini Train) सेवा बंद होती. पण आजपासून पुन्हा एकदा नेरळ माथेरान मिनी ट्रेन धावणार आहे. तरी माथेरान पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रसिध्द हिलस्टेशन (Hill Station) पैकी एक आहे. पावसाळा (Rainy Season)-हिवाळा (Winter) या ऋतुत पर्यटक माथेरानला मोठ गर्दी करतात. तसेच उन्हाळा (Summer Season), दिवाळी (Diwali) किंवा विकेंड्सला (Weekends) देखील पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. पण माथेरान जवळील सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे नेरल. पुणे (Pune)-मुंबईहून (Mumbai) रेल्वेने येणारे प्रवासी नेरळ रेल्वे स्थानकावर उतरतात पण नेरळ पासून माथेरानला पोहोचायला पर्यटकांना खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागते आणि खासगी वाहनाने येण्यास पर्यटकांना मोठी किंमत मोजावी लागते तरी नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा अगदी किफायती दरात उपलब्ध आहे.
आज सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी नेरळ माथेरान ट्रेन धावली. गेले अनेक दिवसांपासून याट्रेनची चाचणी सुरु होती पण नुकत्याचं यशस्वी पार पडलेल्या चाचणी नंतर आज नेरळ माथेरान ट्रेन एकदा पुन्हा धावली आहे. सध्या नेरळ ते माथेरान दोन आणि माथेरान ते नेरळ दोन अश्या चार फेऱ्या दिवसभरात चालणार आहेत. तरी माथेरान पर्यटकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण किफायती दराच्या प्रवासासोबतचं पर्यटकांना मिनी ट्रेनच्या विशेष प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. (हे ही वाचा:- Free Air Tickets: आता मोफत Hong Kong ला भेट देण्याची संधी; वाटण्यात येणार 5 लाख विमान तिकिटे, जाणून घ्या सविस्तर)
नेरळहून मिनी ट्रेन सकाळी ८ वाजून ५० मिनीटांनी सुटेल तर ती माथेरानला सकाळी 11.30 वाजता पोहोचेल. तर नेरळहून दुसरी मिनी ट्रेन दुपारी 2.20 वाजता मिनी ट्रेन सुटेल आणि माथेरानला सायंकाळी पाच वाजता पोहोचेल. तसेच माथेरानमधून दुपारी पावणे तीन वाजता मिनी ट्रेन सुटेल आणि नेरळला सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल. माथेरानहून सायंकाळी 4.20 वाजता मिनी ट्रेन सुटून नेरळला सायंकाळी 7 वाजता गाडी पोहोचणार आहे