Dharavi beats Taj Mahal in Travellers' Choice experiences 2019 (Photo Credits: Wikimedia Commons)

भारतामध्ये पर्यटनाच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळते. अजिंठा, ताजमहाल, कुतुब मिनार यांसारखी अनेक ठिकाणे .पाहण्यासाठी जगभरातून इथे पर्यटक येत असतात. नुकतीच ‘ट्रॅव्हलर्स चॉइस एक्सपिरिएन्स 2019-इंडिया’ची (Travellers’ Choice Experiences 2019- India) यादी प्रसिद्ध झाली आहे, यानुसार मुंबईमधील ‘धारावी झोपडपट्टी’चा (Dharavi Slum) फेरफटका हे पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे. आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय आकर्षणांच्या यादीमध्येही फक्त धारावीला स्थान मिळाले आहे. यावरून हे स्पष्ट जाणवते की पर्यटकांसाठी स्थानिक संस्कृती अनुभवणे हा ट्रिपमधील सर्वात रोमांचकारी अनुभव आहे.

या यादीमध्ये ‘जुन्या दिल्लीमध्ये मोटारसायकलवरून फेरफटका मारणे’ ही गोष्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ताजमहाल आणि लाल किल्ल्याला भेट देणे, दिल्लीमध्ये शॉपिंग करणे, बॉलिवूड दर्शन, दिल्लीच्या जुन्या बाजारामध्ये फेरफटा मारणे, मास्तरजी की हवेलीला भेट, नवीन तसेच जुन्या दिल्लीमधील एका दिवसाची भटकंती, मुंबई दर्शन, दिल्लीमधील संजय कॉलिनी झोपडट्टीला भेट या गोष्टींचा समावेश आहे.

ट्रॅव्हल साइट TripAdvisor ने ही यादी प्रसिद्ध केली आहे. भारतातील तसेच जगभरातील लोकांनी वर्षभरात बुक केलेल्या ठिकाणांवरून ही यादी बनवण्यात आली आहे.

जगातील लोकप्रिय आकर्षणे  -

  • फास्टर दॅन स्कीप-द-लाइन, व्हॅटीकन, सिस्टीन चॅपल आणि सेंट पीटर्स बॅसिलीका टूर रोम, इटली
  • शिकागो आर्किटेक्चर रिव्हर क्रुझ, शिकागो, लिलीनोइस, अमेरिका
  • तुस्कनीची एकदिवसीय सहल, फ्लोरेन्स, इटली
  • स्नोरकलिंग सिल्फ्रा टूर, रिक्जेविक, आयलॅण्ड)
  • रेड रॉक कॅनियन इलेक्ट्रीक बाइक टूर, लास वेगस, नेवाडा, अमेरिका
  • व्हिंटेज साईडकार 1 ते 7 तासाची टूर, पॅरिस, फ्रान्स
  • अॅमस्टरडॅममधील अॅना फ्रॅंक हाऊसमध्ये कॅनल टूर, अॅमस्टरडॅम, नेदर्लण्ड्स
  • उबूडमधील जंगली झोपाळा, उबूड, इंडोनेशिया
  • शीआनमध्ये संध्याकाळची फूड टूर, शीआन, चीन)
  • कॅटूना रिव्हर व्हाइट वॉटर, ओकीरी फॉल्स, न्यूझिलंड

आशिया खंडातील लोकप्रिय आकर्षणे  -

  • उबूडमधील जंगली झोपाळा, उबूड, इंडोनेशिया
  • शीआनमध्ये फूड टूर, शीआन, चीन
  • बिजिंग हूटॉग फूड आणि बियर टूर, बिजिंग, चीन
  • थाय आणि आखा कुकिंग क्लास, चीआंग माय, थायलंड
  • हानोई स्ट्रीट फूड टूअर, हानोई, व्हिएतनाम
  • टोकियो बायकिंग टूर, रोपाँगी, जपान
  • कु ची टनलमधून स्पीडबोटने फेरी, हो ची मिंच शहर, व्हिएतनाम
  • अंगकोर वॅट टूर, सिम रिअॅप, कंबोडिया
  • क्रॅबी सनसेट क्रूझ, अॅओ नाग, थायलंड
  • धारावी टूर, मुंबई, भारतदरम्यान, मुंबईच्या माहिम स्टेशनच्या जवळच ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार येथे जवळपास एक लाख लोक राहतात. मात्र याआकड्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त लोक येथे राहातात. सध्या येथील एका झोपडीची किंमत कोटीच्या घरात गेली आहे. तसेच या झोपड्यातून अब्जावधी रूपयांचा व्यवसाय चालतो.