GoAir Offer: गो एअर ची खास ऑफर; अवघ्या 751 रुपयांत करु शकाल विमानप्रवास
Flight | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

गो एअर (GoAir) एअरलाईन्सने प्रवाशांसाठी खास सेल सादर केला आहे. या सेल अंतर्गत केवळ 751 रुपयांत तिकीट उपलब्ध होणार आहे. काल स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरु करण्यात आलेली ही ऑफर 17 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार असून देशांतर्गत प्रवासासाठी ग्राहक याचा लाभ घेता येईल. या ऑफर अंतर्गत प्रवासी 19 सप्टेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंतच्या तिकीट बुक करु शकतात. (Domestic Flight Ticket Fare: देशात आजपासून विमान प्रवास महागला, तिकिट दरात 12.5 टक्क्यांनी वाढ)

रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या ऑफर्समध्ये काही बदल करुन हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. या ऑफर अंतर्गत गोवा आणि मालदिव्यला फ्री हॉलिडे जिंकण्याची संधी देखील प्रवाशांना मिळणार आहे. यासोबतच 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एन फ्लाईट गिफ्ट्समध्ये सवलत मिळणार आहे.

GO FIRST Tweet:

15 ऑगस्ट रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी दोन जोडप्यांना फ्री गोवा हॉलिडे रिटर्न तिकीट सह जिंकण्याची संधी मिळणार होती. यामध्ये 2 दिवस बीच रिसॉर्टवर स्टे, विमानप्रवास, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळणार होतं. तर इतर सर्व प्रवाशांना मोफत मिठाई आणि पेय मिळणार होतं. यासोबतच 15-A या सीटमध्ये बसलेल्या प्रवाशाला गुडलाईफ कंपनीतर्फे खास गिफ्ट मिळाले.

22 ऑगस्ट रोजी प्रवास करणाऱ्या प्रवासांपैकी एका जोडप्याला मालदिव्यमध्ये फ्री हॉलिडे मिळणार आहे. यामध्ये मालदिव्यच्या रंगाळी आयलँड वर 3 दिवसांचा स्टे, विमानप्रवास, नाश्ता  आणि रात्रीचे जेवण मिळणार आहे. यासोबत या जोडप्याला इंटरनॅशनल प्रिपेड सीमकार्ड देखील मोफत मिळणार आहे. तर इतर प्रवाशांना राखी आणि चॉकलेट्स मोफत वाटण्यात येणार आहेत.