Indian Railways | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मध्य रेल्वे खास ख्रिसमस (Christmas Special Trains) आणि हिवाळ्यादरम्यान (Winter Special Trains) नागरिकांना प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी साप्ताहिक विशेष 36 गाड्यांचे आयोजन करत आहे. या रेल्वे गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस – करमाळी, पनवेल / पुणे-करमाळी दरम्यान धावणार आहेत. या गाड्या विशेष शुल्कासह धावतील. या गाड्याचा तपशील आणि वेळापत्रक खालील प्रमाणे. मध्य रेल्वेने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाळी (द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन)

01459 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 19 डिसेंबर 2022 ते 11 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये प्रत्येक सोमवार आणि बुधवारी रात्री 8.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08.30 वाजता करमाळी येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण 8 फेऱ्या होतील.

01460 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 20 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 या काळावधीत सुरु राहिल. या गाडीच्या एकूण 8 फेऱ्या होतील. दर मंगळवार आणि गुरुवारी ही गाडी सकाळी 09.20 वाजता करमाळीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, आदी ठिकाणी थांबेल. एक फर्स्ट एसी, तीन एसी-2 टियर, 15 एसी-3 टियर आणि दोन जनरेटर व्हॅन, अशी गाडीची रचना असेल.

पनवेल – करमाळी साप्ताहिक विशेष गाड्या (एकूण फेऱ्या 10)

गाडी क्रमांक 01447 साप्ताहिक विशेष पनवेल 17 डिसेंबर 2022 ते 14 जानेवारी 2023 या काळात दर शनिवारी रात्री 10.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08.30 वाजता करमाळी येथे पोहोचेल.गाडीच्या एकूण 5 फेऱ्या होतील.

गाडी क्रमांक 01448 साप्ताहिक विशेष गाडी 17 डिसेंबर 2022 ते 14 जानेवारी 2023 या काळात दर शनिवारी सकाळी 09.20 वाजता करमाळीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.15 वाजता पनवेलला पोहोचेल. या गाडीच्या 5 फेऱ्या होतील. ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आदी ठिकाणी थांबेल.एक AC-2 टियर, 4 AC-3 टियर, 11 स्लीपर क्लास आणि 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 6 जनरल सेकंड क्लास, असी गाडीची रचना असेल.

पुणे – करमाळी साप्ताहिक विशेष

गाडी क्रमांक 01445 साप्ताहिक विशेष पुण्याहून 16 डिसेंबर 2022 ते 13 जानेवारी 2023 या काळात दर शुक्रवारी 5.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी करमाळी येथे रात्री 8.30 वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण 5 फेऱ्या होतील.

गाडी क्रमांक 01446 साप्ताहिक विशेष 18 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2020 या काळात करमाळीहून दर रविवारी 09.20 वाजता (5 सेवा) सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.35 वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड येथे थांबेल. एक AC-2 टियर, 4 AC-3 टियर, 11 स्लीपर क्लास आणि 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी, अशी या गाडीची रचना असेल.

दरम्यान, वरील विशेष गाड्यांना जर आरक्षण हवे असेल तर विशेष ट्रेन साठी 01445 क्मांकावर विशेष शुल्का सह बुकींग करता येणार आहे. विशेष गाड्या क्रमांक 01446, 01447/01448 आणि 01459/01460 विशेष शुल्कावर 16 डिसेंबर 2022 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.coc.in या वेबसाइटवर बुकींग सुरु आहे.

दरम्यान, गाडीचे थांबे आणि विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळापत्रक आणि इतर माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.