आपल्या समाजाचा एक घटक असलेला मात्र या समाजाने नेहमीच या घटकाला आपल्यापासून दूर ठेवलेला 'तृतीयपंथी' (Transgender) समाज. जगातील प्रत्येक सजीवाला पृथ्वीवर आणण्यामागे देवाचा हात असताना काही कोत्या विचारांच्या माणसांमुळे तृतीयपंथींना चांगली वागणूक मिळाली. समाजाने हेटाळणी केल्यामुळे, वाईट वागणूक दिल्यामुळे तृतीयपंथींयांनी स्वत: ला या समाजापासून दूर ठेवले. त्यामुळे आपल्याला असा जन्म पुन्हा मिळू नये यासाठी या समाजाची अंत्ययात्रा, अंत्यविधी खूपच वाईट आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या समाजात तुम्ही कधीच कोणाची अशी अंत्ययात्रा पाहिली नसेल अशा पद्धतीची अंत्ययात्रा तृतीयपंथीयांची काढली जाते.
सामान्यत: एखाद्याच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटूंबिय, नातेवाईक शोक व्यक्त करतात त्याचे धर्माप्रमाणे अंत्यविधी करतात. मृत व्यक्तीच्या शेवटच्या दर्शनासाठी येतात. मात्र याच्या पूर्ण विरुद्ध तृतीयपंथीयांच्या बाबतीत घडते. पाहूया नेमके काय होते यांच्या अंत्ययात्रेला...
1) जेव्हा तृतीयपंथीयाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे देह पांढ-या कपड्याने चेह-यापासून पुर्णपणे झाकले जाते. त्यांचा चेहरा कुणालाही दाखवला जात नाही (त्यांच्या समाजातील लोकांनाही). कारण असा जन्म त्या व्यक्तीस पुन्हा मिळू नये ही एकच भावना यामागे असते.
2) तसेच त्यांची अंत्ययात्रा किंवा मृत पावलेल्या तृतीयपंथीयांचे चेहरा कोणीही पाहू नये यासाठी मध्यरात्री नंतर त्यांची अंत्ययात्रा काढली जाते. कारण कोणी ते बघितल्यास मृत तृतीयपंथीस पुन्हा तोच जन्म मिळतो असा त्या समाजाचे मत आहे. तृतीयपंथींयांचे शाप आणि आशीर्वाद लागतात का? जाणून घ्या या मागची कारणे
3) या अंत्ययात्रेत कोणीही रडत नाही यालट वाद्यांच्या गजरात, आनंदाने ही अंत्ययात्रा काढतात. कारण त्या व्यक्तीची सुटका झाली असे त्यांचे मत असते.
4) त्यांच्या दफनविधीनंतर कोणताही विधी होत नाही. मात्र घरी आल्यावर त्यांचे कुटूंब, त्यांच्या समाजाच्या दु:खाचा बांध फुटतो.
5) ज्या समूहातील तृतीयपंथीयाचा मृत्यू झाला असतो त्या घरातील किंवा त्यांच्या जवळील व्यक्ती 6 दिवसांचा कडक उपवास पाळतात. या उपवासाच्या दिवसात मृत व्यक्तीला पुन्हा हा जन्म मिळू नये म्हणून 'अरावन' या त्यांच्या आराध्य देवतेकडे प्रार्थना करतात.
देवाने निर्माण केलेल्या कुणा सजीवाला केवळ समाजाच्या बुरसटलेल्या विचारांमुळे मृत्यूनंतरही अशा प्रकाराची वागणूक मिळावी ही गोष्ट खूपच लज्जास्पद आहे.