पाळीव प्राण्यांची काळजी (फोटो सौजन्य- फेसबुक)

लख्ख प्रकाश आणि सातत्याने फटाक्यांचे आवाज ऐकू येणारा सण 'दिवाळी' हा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. मात्र तुमच्या जवळ असलेल्या पाळीव प्राण्यांना हा सण आवडतो का? कारण घरातील पाळीव प्राणी हे फटाक्यांना घाबरुन त्यांचा वावर कमी करतात. त्यामुळे 'या' पद्धतीने पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासोबत दिवाळीचा आनंदही तुम्हाला लुटता येईल.
 - पाळीव प्राणी हे फटाक्यांना खूप घाबरतात. त्यामुळे त्यांना फटाक्यांजवळ घेऊन जाणे टाळून त्यांना घरात एकटे सोडू नका.
- फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे घरातील पाळीव प्राण्याच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घराच्या खिडक्या दरवाजे आवश्यक असल्यास उघडे ठेवाववेत.
-फटाके विझल्यानंतर त्याची तयार होणारी राख नष्ट करुन टाका. अथवा पाळीव प्राण्याने ती खाल्ल्यास त्यांच्या फुफ्फुसाला त्रास होण्याची शक्यता असते.
-दिवाळीपूर्वी घरातील पाळीव प्राण्याला पशू वैद्यकीय रुग्णालयात घेऊन जावे. तसेच वैद्यकियांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांच्याकडे लक्ष द्यावे.
-तसेच दिवाळीनंतर प्राण्याचे आरोग्य बरे वाटत नसेल तर त्वरीत उपचार सुरु करावे. तर ऍलोपॅथिक किंवा आर्युवेदिक औषध द्यावे.