गुणकारी कढीपत्ता (फोटो सौजन्य- Pixabay)

स्वयंपाक चमचमीत आणि रुचकर व्हावा यासाठी कोणताही पदार्थ बनवल्यावर त्याला फोडणीचा तडका तर दिलाच जातो. तर तडका देते वेळी वापरला जाणारा कढीपत्ता आरोग्याच्या तक्रारींपासून दूर राहण्यास मदत करतो. तर पाहूया आरोग्यासाठी गुणकारी असलेला कढीपत्ता कसा आपल्या शरीरास मदत करतो.

- कढीपत्तामध्ये लोह, क, अ आणि आयोडिनचे प्रमाण खूप आढळते.

-कढीपत्त्यातले तेल हे जिभेवरची चवीची संवेदना वाढवते. त्यामुळे पदार्थ चविष्ट होण्यासाठी कढीपत्ता वापरतात.

- शरीरामध्ये 'ए' जीवनसत्वाच्या कमतरतेपणामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे आहारात कढीपत्त्याचा समावेश करावा.

-केसांना मजबूती आणि चमकदार बनवण्यासाठी कढीपत्त्याचे तेल लावले. तसेच केसगळतीही थांबते.

-अँण्टीऑक्सिडंट आणि फेनोल्स कढीपत्त्यात आढळतात. जे कँन्सरसारख्या गंभीर आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात.

- कफ, खोकला या आजाराने त्रस्त असाल तर कढीपत्त्याचा आहारात समावेश करावा. तसेच यामधील जी जीवनसत्व, अँण्टी इन्फ्लमेटरी आणि अँण्टीऑक्सिडंट हे गुण शरीरात कफ साचू देत नाहीत

-अपचनाच्या समस्येपासून लांब राहयचे असेल तर कढीपत्त्याचे सेवन करा.

-कढीपत्त्यातील फायबरमुळे साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधूमेहाचा आजार असलेल्या रुग्णांना याचा बराच फायदा होऊ शकतो.