करियरमध्ये यश मिळवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. मात्र ऑफिसात बऱ्याच वेळा आपल्याला कामादरम्यान दुसऱ्या गोष्टी करत असल्याचे पाहिले जाते. त्याचा परिणाम व्यक्तीचे प्रमोशन, सॅलरीमध्ये वाढ किंवा अन्य काही गोष्टींवर होतो. मात्र या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला यशाकडे जाण्याचा मार्ग अधिक सहज दिसतो. परंतु तुम्ही वेळेवर कामाला येणे आणि उशिराने घरी जाण्याने तुमच्या करियरसाठी उत्तम ठरेलच. पण तुम्ही असे समजू नका की त्यामुळे तुमच्याबाबत चांगली प्रतिमा तयार होईल. कारण ऑफिसात व्यक्तीचा स्वभाव नाही तर व्यक्तीचे काम खासकरुन पाहिले जाते.
काही व्यक्ती ऑफिसात काम करताना अन्य गोष्टी करत असल्याचे दिसून आल्यास त्याबाबत एक वेगळाच विचार केला जातो. तसेच व्यक्तीला काही अशा गोष्टींची सवय होती की त्याचा परिणाम होतो. तर जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या करिवर परिणाम होईल.
-ज्या व्यक्तीच्या ऑफिसात ड्रेस कोड नसतो त्यांनी आपल्या ड्रेस कोडवर फार लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण अशा ठिकाणी योग्य पद्धतीचे कपडे परिधान केल्यास तुमचे व्यक्तीमत्व अधिक कळून येते. परंतु त्याचा विचार न केल्यास त्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होतो.
- कामाच्या वेळेस सारखा ब्रेक घेतल्याने तुमच्या बाबत एक चुकीची प्रतिमा समोरच्या व्यक्तिच्या मनात निर्माण होते. त्यामुळे तुम्ही ही सवय बदलणे आवश्यक आहे.
- ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही वारंवार उशिराने जात असल्यात ती सवय आधी बदला. कारण यामधून तुम्ही वेळेच्या बाबत किती अनपरफेक्ट आहात ते दिसून येते.
(गाढ झोप घेतल्यास 30 टक्के तणाव होईल दूर - संशोधन)