Skin care: परफ्यूम लावताना करु नका 'या' चूका, होईल मोठे नुकसान
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

काही लोकांना परफ्यूम (Perfume) लावणे फार आवडते. त्यामुळे ते काही खास ब्रँन्डचे आणि सुंदर वास असणारे परफ्यूम विकत घेतात. शरिरातून निघणाऱ्या घामाच्या माध्यमातून येणारी दुर्गंधी दूर करण्याचे काम हे परफ्यूम करतात. त्याचसोबत परफ्यूमच्या वासाने तुम्हाला रिफ्रेश सुद्धा वाटते. परंतु नेमके कोणते परफ्यूम आपल्याला सूट होतील किंवा ते वापरल्याने आपल्याला कोणती अॅलर्जी होईल का असे विविध प्रश्न मनात उद्भवतात. त्यामुळे एखादा परफ्यूम खरेदी करण्यापूर्वी तो तुमच्या त्वचेला सूट होईल ना त्याबद्दल खात्री करुन घ्या.

तसेच काही लोकांना परफ्यूम लावल्यानंतर त्वचेवर जळजळ होण्यास रॅशेज येण्यास सुरुवात होते. त्याचसोबत चुकीचा परफ्यूम निवडल्याने अधिक समस्या वाढू शकते. त्यामुळे परफ्यूम लावताना काही चुका करणे टाळा. अन्यथा मोठे नुकसान तुम्हाला होऊ शकते.(टिकली लावल्यास होते अ‍ॅलर्जी? 'या' सोप्प्या टीप्सने दूर होईल समस्या)

तुम्ही काही लोकांना पाहिले असे की, ते आपल्या मनगटावर परफ्यूम लावल्यानंतर दुसऱ्या हाताला सुद्धा लावतात. अशी चूक कधीच करु नका. कारण परफ्यूमच्या केमिकलमध्ये बदल होतो. यामुळेच परफ्यूम शरीरावरुन लवकर उडून जातो. या व्यतिरिक्त ज्या लोकांची त्वचा सेंसिटिव्ह असते त्यांना काही प्रमाणात परफ्यूम लावल्यानंतर जळजळ होते.

त्याचसोबत परफ्यूम खरेदी करताना काही लोग स्ट्राँग वास असणारा परफ्यूम घेतात. मात्र यामुळे काही वेळेस डोके दुखणे किंवा नाकातून पाणी येण्याची समस्या होऊ शकते. अशा प्रकारचे परफ्यूम वापरताना त्याचे काही थेंब हवेत स्प्रे करा.

या व्यतिरिक्त महत्वाचे म्हणजे दुसऱ्यांच्या आवडीचे परफ्यूम कधीच खरेदी करुन का. नेहमीच तुमच्या आवडीचे परफ्यूम निवडण्यासह ते तुम्हाला सूट होतील का याचा सुद्धा विचार करा. परफ्यूम खरेदी करताना त्याची तुम्हाला अॅलर्जी होणार नाही ना याबद्दल ही खात्री करुन घ्या. नेहमीच उत्तम ब्रँन्डसह क्वालिटीचे परफ्यूम घ्या. परफ्यूम खरेदी करतेवेळी त्वचेवर त्याची टेस्ट करा.(Beauty Tips: मास्क घातल्यानंतर तुमची Lipstick बिघडते का? मग 'या' खास पद्धती नक्की वापरुन पहा)

काही लोक शरिरावर परफ्यूम लावण्याऐवजी कपड्यांवर लावतात. मात्र ही चूक तुम्ही करु नका. तर परफ्यूम हे नेहमीच आपल्या शरिरावर लावावे. जेणेकरुन त्याचा वास दीर्घकाळ टिकून राहतो. या व्यतिरिक्त कपड्यांवर तो लावल्यास परफ्युमचे डाग राहू शकतात.