Beauty Tips: मास्क घातल्यानंतर तुमची Lipstick बिघडते का? मग 'या' खास पद्धती नक्की वापरुन पहा
प्रतिकामत्मक फोटो (Photo Credits: PixaBay)

Beauty Tips: सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व नागरिक मास्क घालत आहेत. मात्र, मास्क मुलींच्या सौंदर्यात अडथळा ठरला आहे. कारण, फेस मास्क लावल्याने त्यांचा मेकअप खराब होतो. विशेषत: जेव्हा मुली लिपस्टिक लावतात आणि मास्क घालतात तेव्हा लिपस्टिक संपूर्ण चेहऱ्यावर पसरते. त्यामुळे सर्व मेअकप खराब होतो आणि चेहरा विचित्र दिसतो.

जर तुम्ही मास्कमुळे लिपस्टिक लावणं टाळत असाल तर, काळजी करू नका. आम्ही आपल्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुमची लिपस्टिक ओठांवर अधिक काळ टिकू शकते. ओठांवर लिपस्टिक जास्त काळ टिकण्यासाठी खास टिप्स जाणून घेऊयात. (हेही वाचा -  Fashionable Mask for Navratri : कोरोनाच्या दिवसात सुद्धा यंदाच्या नवरात्रीला सुंदर दिसण्यासाठी 'हे' भन्नाट मास्क पहा)

लिप पेन्सिलचा वापरा करा -

ओठांवर लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लिप पेन्सिलचा वापर करा. त्यामुळे तुमचे ओठ सुंदर आणि आकारात दिसतील. ओठांच्या पेन्सिलसाठी आपण न्यूड लिप कलरचा वापर करू शकता.

मॅट लिपस्टिकचा वापर -

मॅट लिपस्टिक लिप ब्रशने लावण्याऐवजी थेट ट्यूबने लावा त्यामुळे तुम्हाला लिपस्टिक लावणं अधिक सोप होईल. जर तुमची मॅट लिपस्टिक फारच कोरडी असेल तर, ती लावण्यापूर्वी त्यावर ब्लो ड्रायर चालवा. यामुळे लिपस्टिक वितळेल आणि ओठांवर व्यवस्थितरित्या लागेल.

टिश्यू पेपरचा वापर करा -

जेव्हा तुम्ही लिपस्टिक लावाल, तेव्हा पहिल्यांदा आपले ओठ टिश्यू पेपरने पुसा, जेणेकरून लिपस्टिक मास्कला लागणार नाही.

पावडरचा वापर करा -

ओठांवर लिपस्टिक टिकण्यासाठी ओठांवर दिसणार नाही, अशा पद्धतीने पावडर लावा. ही पावडर आपल्या ओठांवर आपल्या लिपस्टिकचा रंग सेट करेल. याचा उपयोग केल्याने तुमची लिपस्टिक पसरणार नाही किंवा रंगही हलका होणार नाही.