Fashionable Mask for Navratri : कोरोनाच्या दिवसात सुद्धा यंदाच्या नवरात्रीला सुंदर दिसण्यासाठी 'हे' भन्नाट मास्क पहा
( Instagram Photo )

अवघ्या काही दिवसांनी नवरात्री उत्सवाची सुरवात होईल आणि देवीच आगमन होईल.नवरात्र  म्हटले की आपण सर्वच जण सर्वात आधी खरेदी करतो ते म्हणजे कपड्यांची.कारण नवरात्री च्या नऊ दिवसात नऊ रंगांचे कपडे परिधान केले जातात.गरबा आणि दांडिया खेळायला जाताना सगळ्यात जास्त चर्चा होते ती कोणी कसे आणि स्टाइलिश कपडे घातले आहेत याचीच. पण यंदा सगळीकडे कोरोनाचे सावट आहे त्यामुळे गरबा आणि दांडिया खेळण्यावर सरकारकडून बंदी घालण्यात आलेली आहे. पण तुम्हाला निराश होण्याची काहीच गरज नाही. चांगले कपडे घालून तुम्हाला दांडिया आणि गरबा खेळायला जाता जरी नाही आले तरी यावर्षी तुम्ही फॅशनेबल आणि यूनिक मास्क घालून नक्कीच स्टाईल मारु शकता.  जाणून घेऊयात आता कोणते यूनिक डिझायनर मास्क सध्या उपलब्ध आहेत. ( Navratri Decoration Idea for Home : घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमी वस्तू वापरून अशी करा नवरात्रीची सजावट)

पारंपारिक/साडी  मास्क 

सध्या बाजारात असे ट्रेडिशनल मास्क उपलब्ध झाले आहेत.जे तुम्हाला अगदी पारंपारिक लुक देतील.यामध्ये खुप ब्राइट आणि डिझाईन ही सध्या उपलब्ध झाले आहेत.आणि सणासुदीच्या काळात हे मास्क अगदी परफेक्ट आहेत.

जरी मास्क 

सध्या बाजारात कॉटन जरी च्या कापडाचे ही मास्क उपलब्ध झाले आहेत.तसेच आता सणासुदीचे दिवस असल्याने बऱ्याच वेबसाईट वर मास्क बरोबर एखादी मॅचिंग ज्वेलरी ही देण्यात येते. तुमच्या ड्रेस वर मॅचिंग मास्क आणि त्याबरोबर मिळणारी ज्वेलरी ही उत्तम डील ही होऊ शकते.

खण मास्क

बऱ्याच जणांना सणांमध्ये खुप ट्रेडिशनल लुक करायला आवडतो जसे खणाची साडी किंवा आता खणाचा ड्रेस या पर्यायाचा वापर ही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.तर अशा लोकांना जर प्रश्न पडला असेल की त्यांनी कसा मास्क घायचा तर त्यांच्यासाठी बाजारात खास खणाचे मास्क ही उपलब्ध झाले आहेत.आणि त्या मास्कना खुप सुंदर असा ट्रेडिशनल लुक ही देण्यात आला आहे.तुम्ही नक्कीच या पर्यायाचा विचार करू शकता.

सिंपल आणि सोबर मास्क 

आपल्यातील बऱ्याच जणांना खुप रंगीत किंवा भडक रंग आवडत नाहीत आणि खुप फॅशनेबल कपडे ही आवडत नाही त्यामुळे ते कपडेही शक्यतो लाइट रंगाचे घालणे पसंत करतात.अशा लोकांसाठी पण मास्क मध्ये एक बेस्ट पर्याय उपलब्ध आहे.खुप छान लाइट कलर आणि त्यावर अगदी कमी डिझाईन  असलेले मास्क ही सध्य बाजारात उपलब्ध आहेत.

 

तेव्हा या नवरात्रीमध्ये छान कपडे घालता येणार नाहीत म्हणून नाराज न होता हे मस्त आणि फैशनेबल मास्क घाला आणि मिरवा.