अवघ्या काही दिवसांनी नवरात्री उत्सवाला सुरवात होईल आणि देवीच आगमन होईल.पण सगळीकडेच कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.त्यामुळे या वर्षी नवरात्र आपण नेहमी जशी साजरी करतो तशी यावेळी साजरी करणे शक्य नाही.पण असे जरी असले तरीही तुमच्या घरी जर देवीच आगमन होत असे आणि त्यासाठी तुम्हाला बाहेर जाण टाळून घरीच डेकोरेशन करायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास आणि सोप्या गोष्टी ज्या करुन तुम्ही घरच्याघरी सुंदर डेकोरेशन करू शकाल.(Navratri 2020 Dates & Colours for Facemask: सुरक्षित शारदीय नवरात्रोत्सवासाठी यंदा पहा नवरात्रीच्या नऊ रंगांनुसार कोणत्या तारखेला कोणत्या रंगाचा मास्क वापराल?)
बॉक्स चा वापर करुन असा करा देवीसाठी खास मंडप
देवीसाठी सर्वात आधी आणि महत्वाची गोष्ट ठरवायची किंवा आणायची असते ती म्हणजे देवी जय ठिकाणी बसवली जाणार त्या ठिकाणचे मंडप किंवा पाट.घरत उरलेल्या वस्तूंच्या बॉक्स आणि घरी असलेल्या रंगीत कागदांपासून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सुरेख असे मंडप/ पाट करू शकता.
ओढणींचा वपर करुन अशी करा सजावट
तुमचं घर जर मोठे असेल आणि देवीला ज्या ठिकाणी तुम्ही विराजमान करणार आहात ती जागा मोठी असेल तर तुम्ही ही सजावट नक्की करू शकता.आपल्या सगळ्यांच्याच घरात रंगेबीरंगी ओढणी किंवा रंगेबीरंगी कापड असतातच.आर्टिफिशियल फूल असतील तर त्यांचा ही वापर करता येईल त्याच ओढणींचा/कपड्यांचा आणि फुलांचा वापर करुन तुम्ही अशी सुंदर सजावट करू शकता.
कागदाचे ग्लास आणि रंगेबीरंगी कागदापासून सजावट
तुम्हाला हस्तकला आणि चित्रकला याची आवड असेल तर तुम्ही नक्की ही सजावट घरी करू शकाल.रंगीत कार्ड पेपर आणि बाजारात अगदी सहज मिळणारे कागदी ग्लास पासून ही सजावट करता येते.कार्ड पेपर ची फूल करुन आणि ग्लासांवर कलरचा वापर तसेच घरी उपलब्ध असलेल्या दिव्यांपासून तुम्ही अशा प्रकार सुंदर सजावट करू शकता.
कागद ,मणी, आणि धाग्यापासून सजावट
आपल्या सगळ्यांच्याच घरी उपयोगी नसलेले कागद किंवा वर्तमान पत्रे असतता. आणि बाजारात आपल्याला कमी किमतीत रंगीत मणी आणि लोकर अगदी सहज उपलब्ध होते.याच कागद ,मणी, आणि धाग्यापासून तुम्ही घरातली सजावटी बरोबर अगदी तोरण ही करू शकता.
तेव्हा या अशा कोरोनाच्या काळात बाजारात नवरात्रीच्या डेकोरेशनसाठी गर्दीमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा दाखवलेले पर्याय वापरून घरच्या घरी अगदी कमी साहित्य वापरून छान आणि सुंदर डेकोरेशन करा.