टिकली लावल्यास होते अ‍ॅलर्जी? 'या' सोप्प्या टीप्सने दूर होईल समस्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

कपाळावर टिकली शिवाय एखाद्या स्री चा शृगांर अपूर्ण राहिल्यासारखा वाटतो. याच कारणामुळे बहुतांश महिला दिवसभर आपल्या कपाळावर टिकली लावणे पसंद करतात. तर काही अविवाहित महिला सुद्धा आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या कपाळावर टिकली लावताना दिसून येतात. मात्र काही वेळेस असे होते की, टिकली लावण्यासाठी पॅरा टर्शियरी ब्युटील फिनॉल नावाच्या केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे कपाळावर भुवयांच्या मध्ये टिकली लावण्याजागी खाज, रॅशेस, सूज किंवा ड्राय स्किनसह सफेद डाग पडू लागतात. तुम्ही सुद्धा अशा समेस्येला सामोरे जात असाल तर चेहऱ्याची सुंदरता काहीशा प्रमाणात कमी झाल्याचे तुम्हाला सुद्धा वाटत असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांनी त्यापासून सूटका मिळवू शकता.

तुम्हाला टिकली लावल्यानंतर अॅलर्जी होत असेल तर कोरफडचे जेलचा वापर करु शकता. त्यासाठी तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी टिकली ज्या ठिकाणी लावता तेथे हे जेल लावा आणि हळूवार पणे मसाज करा. यामुळे अॅलर्जी पासून तुम्हाला काहीसा दिलासा मिळू शकेल. तसेच तुम्ही तिळाचे तेल सुद्धा या समस्येसाठी वापरुन पाहू शकता. हे तेल तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर किंवाा रात्री दोन-तीन थेंब बोटाने अॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावून 1-2 मिनिट मसाज करा. त्याचसोबत मॉइश्चराइजर किंवा लोश सुद्धा तुम्ही लावू शकता. यामुळे ड्रायनेससह खाजेची समस्या दूर होईल.(तुमची 8 तास झोप झाल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो? 'हे' असू शकते कारण)

दरम्यान, जो पर्यंत तुमची अॅलर्जी बरी होत नाही तोपर्यंत टिकली लावणे टाळा. मात्र जर टिकली लावायची झाल्यास तर स्टिकर मध्ये येणाऱ्या टिकली ऐवजी कूंकु लावा. त्याचसोबत कुंकू अॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावण्याऐवजी थोडे वर किंवा खाली लावा. सध्याच्या कुंकू मध्ये सुद्धा काही केमिकल्स असतात. त्यामुळे अॅलर्जी झालेल्या ठिकाणी ते लावण्यापासून दूर रहा.