Nag Panchami 2022 Messages: नागपंचमी सणाच्या शुभेच्छा देणारे खास संदेश, मेसेज; श्रावणातील पहिल्यावहिल्या साणासाठी खास Wishes, Quotes
Nag Panchami

हिंदू पंचागानुसार श्रावण शुक्ल पंचमी या तिथीला 'नागपंचमी' (Nag Panchami 2022 ) साजरी होते. श्रावण शुक्ल पंचमीलाच नागपंचमी म्हणून ओळखले जाते. या दिवशी भगवान शंकराचे आभूषण असलेल्या नागाची पूजा केली जाते. एकमेकांना संदेश पाठवून (Nag Panchami 2022 Messages) शुभेच्छा दिल्या जातात. पूरानात सांगितल्यानुसार दावा केला जातो की, नागाची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती, सिद्दी आणि धनदौलत प्राप्त होते. एखाद्याच्या कुंडलीत जर राहू केतू योग्य हवे तसे कार्य करत नसतील तर या दिवशी विशेष पूजा केली जाते असेही सांगीतले जाते. ज्या लोकांच्या स्वप्नात साप येतो. त्यांनीही नागपंचमी दिवशी पूजा करावी असे सांगितले जाते. नागपंचमी सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. श्रावणातील हा पहिल्यावहिलाच सण. या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश, मेसेजेस, HD Images, Wallpapers सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून आपण शेअर करु शकता.

नागपंचमी सणाच्या शुभेच्छा!

दूध लाह्या वाहू नागोबाला

चल ग सखे वारुळाला

नागोबाला पूजायाला|

नागपंचमीच्या भक्तीमय शुभेच्छा!

Nag Panchami

नागपंचमी सणाच्या शुभेच्छा!

उत्सवांची झुंबड

घेऊन येणाऱ्या श्रावण

महिन्यातील पहिलाच सण

म्हणजे शुद्ध पंचमीला

येणारी नागपंचमी

नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Nag Panchami

नागपंचमी सणाच्या शुभेच्छा!

रक्षण करुया नागाचे

जन करुया निसर्गाचे

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Nag Panchami

नागपंचमी सणाच्या शुभेच्छा!

वारुळाला जाऊया,

नागोबाला पुजूया...

नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!

Nag Panchami

नागपंचमी सणाच्या शुभेच्छा!

देवतांचे देवता महादेव

भगवान विष्णूचे सिंहासन

ज्याने पृथ्वीला उंच केले

त्या सर्प देवाला माझा नमस्कार

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात, म्हणून या दिवसास ‘नागपंचमी’ म्हणतात. महाराष्ट्रात या सणाची विशेष परंपरा आहे. या सणासाठी नवविवाहिता माहेरी येतात. पंचमीचा सण त्या आनंदाने साजरा करतात. केवळ विवाहिताच नव्हे तर सर्व वयोगटातील सुवासीनी आणि लहान मुलीही या दिवशी नागोबाची पूजा करतात. त्यासाठी वारुळाला जातात. वारुळाला जाऊद दूध, लाह्यांचा आणि पूरणपोळीचा नौव्यद्यही अर्पण करतात.