गुजरात (Gujarat) राज्यातील वडोदरा (Vadodara ) शहरात एका महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार (Husband Wife Relationship) दाखल केली आहे. ही तक्रार पाहून केवळ पोलीसच नव्हे तर सर्वांनाच धक्का बसला आहे. होय, महिलेने दावा केला आहे की, आठ वर्षांपूर्वी तिचे एका पुरुषाची विवाह झाला. त्याच्यासोबत पत्नी म्हणून आठ वर्षे तिने संसारही केला. पण आताच तिला कळले आहे की, तिचा तो पती पुरुष नाही. त्याने स्वत:वर लिंगबदल करुन शस्त्रक्रिया (Sex Change Surgery) केली आहे. त्यानंतर तो पुरुष झाला आहे. घडल्या प्रकारामुळे तक्रारदार महिलेला चांगलाच धक्का बसला आहे. तिने आपल्या पती विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.
वडोदरा पोलिसांमधील गोत्री पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शितल नावाच्या तक्रारदार महिलेने आपला पती विराज वर्धन (पूर्वीची विजया) याच्यावर 'अनैसर्गिक संबंध' आणि फसवणूक केल्याचा दावा तक्रारीत केला आहे. यात तिने पतीकडील कुटुंबीयांचीही नावे दाखल केली आहेत. एकूणच या प्रकाराचा सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस तपास करत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शीतलने पोलिसांना सांगितले की, नऊ वर्षांपूर्वी एका मटर्मोनी वेबसाइटद्वारे विराज वर्धनला भेटली होती. तिचा पूर्वीचा नवरा रस्ता अपघातात मरण पावला, तिला तिच्या मुलीसोबत सोडले जी त्यावेळी 14 वर्षांची होती. (हेही वाचा, Hypersexual Husband: 89 वर्षीय पती वारंवार करत होता Sex ची मागणी; त्रासलेल्या 87 वर्षीय पत्नीने केली पोलिसांत तक्रार)
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शीतलने पोलिसांना सांगितले की, नऊ वर्षांपूर्वी एका वैवाहिक मैट्रिमोनी (Matrimony) वेबसाइटद्वारे शितल आणि विराज वर्धन यांची भेट झाली. शितल हीचा हा पुनर्विवाह होता. तिचा आगोदरच्या पतीचा रास्ताअपघातात मृत्यू झाला. त्यानंतर तिने दुसरा विवाह विराज वर्धन याच्यासोबत झाला. तिच्या पतीचा मृत्यू झाला त्या वेळी तिची मुलगी 14 वर्षांची होती.
शितल आणि विराज वर्धन यांच्या 2014 मध्ये औपचारिक पद्धतीने विवाह झाला. या वेळी दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे विवाहानंतर ते हनीमूनसाठी काश्मीरलाही गेले होते. दरम्यान, विराज वर्धन यान तिच्याशी प्रदीर्घ काळ शरीरसंबंध ठेवले नाहीत. तो सातत्याने काहीतरी कारणे देऊन शरीरसंबंध करणे टाळत होता. नंतर त्याने काही दिवसांनी सांगितले की, तो रशियात असताना त्याला एक अपघात झाला होता. त्यामुळे तो लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे, असा तक्रारदार महिलेने तक्रारीत दावा केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
शितलने तक्रारीत म्हटले आहे की, किरकोळ शस्त्रक्रियेनंतर तो पूर्ण बरा होईल असे आरोपीने महिलेला आश्वासनही दिले होते. जानेवारी 2020 मध्ये, त्याने तिला सांगितले की त्याला लठ्ठपणासाठी शस्त्रक्रिया करायची आहे. तथापि, त्याने नंतर खुलासा केला की तो दूर असताना त्याच्यावर लिंग पुनर्नियुक्तीची शस्त्रक्रिया झाली होती. दरम्यान, आरोपी दिल्लीचा रहिवासी असून त्याला वडोदरा येथे आणण्यात आले आहे, अशी माहिती गोत्रीचे पोलीस निरीक्षक एमके गुर्जर यांनी दिली आहे.