
अनेक राज्यांमध्ये महिलांना वाचवण्यासाठी, सल्ला देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरु केले आहेत. अशा क्रमांकावर शारीरिक जबरदस्ती किंवा विनयभंगाच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. आता गुजरातमधील वडोदरा (Vadodara) येथे अशाच हेल्पलाइन क्रमांकाद्वारे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 87 वर्षीय वृद्ध महिलेने पतीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. पतीच्या वाढत्या सेक्स डिमांडमुळे आपण त्रासलो असल्याचे महिलेने सांगितले.
महिलांच्या मदतीसाठी सुरु केलेल्या 181 या हेल्पलाइनवर महिलेने फोन करून मदत मागितली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘वृद्ध महिलेचा पती 89 वर्षांचा आहे. तो महिलेकडे वारंवार सेक्सची मागणी करतो. महिला आजारी आहे. त्यामुळे ती पतीची सेक्सची मागणी पूर्ण करू शकत नाही.’
अधिकारी पुढे म्हणाले, ‘आधी दोघांमध्ये चांगले संबंध होते, परंतु आजारी पडल्यानंतर ती शक्यतो अंथरुणावरच राहते. वृद्ध महिलेला सून आणि मुलाच्या मदतीशिवाय चालताही येत नाही. पतीला पत्नीच्या स्थितीची जाणीव होती, परंतु तरीही तो सतत सेक्सची मागणी करायचा. त्यासाठी नकार दिल्यावर तो ओरडायचा आणि भांडायचा.’ (हेही वाचा: पत्नीसोबत Sex करत नव्हता पती, मात्र ब्लूटूथ स्पीकरच्या मदतीने 'हस्तमैथुन' करताना आढळला)
पतीच्या अशा वागण्यामुळे त्रस्त झालेल्या वृद्ध महिलेने पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आणि हेल्पलाइनवर फोन करून आपली परिस्थिती सांगितली. त्यानंतर ताबडतोब एक पथक त्यांच्या घरी पोहोचले व वृद्ध पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अधिका-यांनी वृद्ध व्यक्तीला योगा करण्याचा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या क्लबमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला, जेणेकरुन त्याचे लक्ष सेक्सपासून वळवता येईल. वृद्ध पतीला एखाद्या डॉक्टरांकडे न्यावे, असे विचार कुटुंबीयांनी मांडला.