प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

सेक्स (Sex) ही मानवाची फार महत्वाची गरज आहे. अनेक जोडपी लग्नानंतर काही वर्षांनी तक्रार करतात की, त्यांच्यामधील शारीरिक संबंध कमी झाले आहेत. बरेचवेळा जोडीदार एकमेकांना आपला सेक्समधील रस कमी झाल्याचे सांगतात. मात्र दुसरीकडे ते हस्तमैथुन (Masturbation) करत असतात किंवा इतर व्यक्तीसोबतचा सेक्स एन्जॉय करत असतात. आता अशाच एका नवऱ्याचे सत्य त्याच्या बायकोने जगासमोर मांडले आहे. या जोडप्यामध्ये गेली अनेक वर्षे सेक्स होत नाहीये. त्यामुळे त्यांनी लैंगिक समुपदेशन देखील केले आहे. परंतु आता ब्लूटूथ स्पीकरच्या चुकीमुळे पती हस्तमैथुन करताना पकडला गेला आहे.

पत्नीला तिचा पती टॉयलेटमध्ये हस्तमैथुन करताना आढळला, त्यानंतर ती प्रचंड संतापली. पत्नीने सांगितले, ‘जेव्हा त्याने प्रपोज केले, तेव्हा आपण स्पष्ट केले होते की, मला सेक्सशिवाय आयुष्य नको आहे. जर तो नेहमी समस्या सुधारण्यासाठी काम करणार असेल, तरच मी लग्न करेन. त्याने तसे वचन दिले पण गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी काहीही केले नाही. तो माझ्यासोबत लैंगिक संबंध का ठेवत नाही याचे उत्तर त्याच्याकडे नाही.’

ती पुढे म्हणाली, ‘आज सकाळी तो टॉयलेटमध्ये त्याचा फोन सोबत घेऊन गेला. मी बेडरूममध्ये होते. बेडरुममधला ब्लूटूथ स्पीकर अचानक त्याच्या फोनला जोडला गेला आणि सुमारे 10 मिनिटे स्पीकर त्याच्या फोनशी कनेक्ट होता. त्यातून दिसून आले की, टॉयलेटमध्ये बसून तो पॉर्न पाहत होता व हस्तमैथुन करत होता. तो माझ्याशी सेक्स करत नाही परंतु पॉर्न पाहतो, ही गोष्ट नक्कीच दुःखदायक आहे.’ (हेही वाचा: 'लठ्ठ बॉयफ्रेंड नको गं बाई' म्हणत Girlfriend ने केले ब्रेकअप; इरेला पेटलेल्या तरुणाने घेतले मनावर, बनला अनेकींचा क्रश)

ती म्हणते, ‘सुरुवातीला मला वाटले की, तो अलैंगिक झाला आहे. परंतु तो जर पॉर्न पाहत असेल, हस्तमैथुन करत असेल तर नक्कीच त्याला सेक्समध्ये रस आहे. मात्र त्याला माझ्याशी सेक्स करायचा नाही. माझे त्याच्यावर प्रेम आहे परंतु त्याची ही गोष्ट मला खात आहे.’ शेवटी ती म्हणते, ‘मला त्याला सोडायचे नाही. परंतु तो समस्या सुधारण्याची काहीही करत नाही, मी काय करू?.’