Sex Tips: अतिवजनामुळे सेक्स करण्याची इच्छा कमी होते का? या समस्येची माहिती आणि उपाय जाणून घ्या सविस्तर
Impact of Obesity On Your Libido (Photo Credits: The Noun Project)

Sex Query: अलीकडे वजन वाढण्याच्या (Obesity)  समस्येने अनेकजण ग्रासले आहेत. अनियमित जीवनशैली, व्यायामाची कमतरता, शरीराची कमी हालचाल अशा विविध कारणाने वजन वाढणे हे आजकाल अत्यंत कॉमन झाले आहे. अनेकजण या समस्येकडे अगदी सहज दुर्लक्ष करतात मात्र असे करणे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. खरंतर वजन वाढण्याचे अनेक दुष्परिणाम आपण सर्व जाणून आहोत पण हेच अति वजन तुमच्या सेक्स लाईफवर (Sex Life) सुद्धा परिणाम करते हे तुम्ही जाणता का? होय, अनेक तज्ञांच्या माहितीनुसार, वजन वाढल्याचा तुमच्या सेक्स ड्राईव्हवर गंभीर परिणाम होतो अनेक पद्धतीने हे वजन तुमची कामेच्छा मारते. याबाबत अनेकांना काही समज- गैरसमज आहेत आज या लेखाच्या माध्यमातून याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.  Sex Tips: महिलांनी सेक्स दरम्यान 'या' पाच गोष्टी केल्यास प्रत्येक पुरुषावर होते जादू; जाणून घ्या

सेक्स ड्राइव्हवर वजन वाढल्याचा कसा परिणाम होतो?

लठ्ठपणाचा संबंध थेट सेक्स ड्राइव्हशी जोडला जाऊ शकत नाही , परंतु वजन वाढल्याने कमी अधिक प्रमाणात सेक्स ड्राइव्ह नक्कीच कमी होते. अतिवजन हे हाय कोलेस्ट्रॉल आणि इन्सुलिन यासारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण करते याचा आपल्या सेक्श्युअल स्टॅमिना वर परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये ही समस्या अधिक जाणवते. शरीरातील चरबी ही रक्तवाहिन्यांना अडथळा ठरते त्यामुळे शरीरात हार्मोन्स आणि रक्ताचा पुरवता योग्य होत नाही परिणामी एकूणच सेक्स ड्राइव्ह कमी होते.

सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी काय उपाय कराल?

तुमच्या वजन आणि उंचीची तुलना करून स्वतःचे शरीर निदान आदर्श वजनाच्या जवळपास आणण्याचा प्रयत्न करा. यासाठी जीवनशैलीत सुधारणा हा एकमेव मार्ग परिणामकारक ठरतो. याचा प्रत्यय घ्याचा असल्यास सुरुवातीला 3-4 किलोग्रॅम इतके वजन कमी करूनही तुम्ही तुमची सेक्स ड्राइव्ह वाढतेय का हे तपासून पाहू शकता. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी अधिक पौष्टिक आहार घ्या. वजन कमी करण्यात मदत करण्यासाठी फायबर युक्त, कमी चरबीयुक्त, प्रथिने आणि संतुलित आहाराची निवड करा.पेल्विक भागात रक्त पुरवठा वाढवण्यासाठी व्यायाम करा. Sex करण्यापूर्वी 'या' पदार्थांचे सेवन करणे पडू शकते महागात; जाणून घ्या सविस्तर माहिती

दरम्यान, सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी दोन्ही पार्टनर हे सकारात्मक असणे गरजेचे आहे, नैराश्य हे सेक्सलाईफ मधील मोठा अढथळा ठरते. त्यामुळे तुमच्या पार्टनरसोबत हेल्थी रिलेशनशिप बाळगणे तुमच्या सेक्स लाईफ सोबतच एकत्रित जीवनासाठी सुद्धा नेहमीच फायदेशीर ठरेल.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)