Image For Representation (Photo Credits: The Noun Project and File Image)

लॉकडाउन (Lockdown) काळात आपल्या पार्टनर सोबत अडकलेल्या मंडळींना जणु काही सेकेंड हनिमून करण्याची संंधी मिळाली आहे. अशावेळी या संधीचा योग्य वापर करुन आपल्या अन्यथा वेळेअभावी बोअरिंग झालेल्या नात्यात नवा उत्साह आणु शकता. असं म्हणतात की सेक्स (Sex) ही एक अशी गोष्ट आहे जी कोणत्याही कपल ला केवळ शरीरानेच नाही तर मनाने सुद्धा जवळ आणते, त्यामुळे या फ्री टाईम मध्ये सेक्स करुन आपल्या पार्टनर सोबत जवळीक साधण्याचा विचार तुम्ही नक्कीच करु शकता. या तुमच्या विचाराला आणखीन एक्साईटिंग बनवण्यासाठी काही खास टिप्स आम्ही आज देणार आहोत. दरवेळी सेक्स मध्ये पुरुषाचा रोल हा अधिक असल्याचे मानले जाते. पण असे गृहित धरण्याची काहीच गरज नाही, याउलट, महिलांनो तुम्ही अशा काही गोष्टी करु शकता की ज्याने तुम्हाला फार मेहनत न घेताही तुमच्या पार्टनरला उत्तेजीत करु शकता. सेक्स दरम्यान करायच्या अशाच पाच गोष्टी ज्याचा प्रत्येक पुरुषावर हमखास परिणाम होतोच या लेखाच्या माध्यमातुन जाणुन घेउयात... Sex Tips: सेक्स करताना Lube म्हणून नारळाच्या तेलाचा उपयोग किती सुरक्षित आहे? जाणून घ्या

तुमच्या पार्टनरचा टाईप ओळखा

काही पुरुषांना सेक्स करतेवेळी डॉमिनेटींग पार्टनर आवडते तर काहींना सर्व काही ऐकुन घेणार्‍या पार्टनर बाबत आकर्षण वाटते, त्यामुळे आधी त्याला काय आवडते याचा अंदाज घ्या. जर तुम्हाला शक्य होणार असेल तर तसा बदल तुमच्या सेक्स पर्फोर्मन्स मध्ये करा.

टच मध्ये आहे जादु

अनेक पुरुषांना मांड्यांच्या आतील बाजूस, छाती आणि चेहऱ्यावर स्पर्श केलेले आवडते.या शिवाय पाठीवर अलगद हात फिरवून सुद्धा त्यांना उत्तेजित फील होते. तुमच्या पार्टनरचे असेच काही भाग ओळखून सेक्स दरम्यान त्यांना तसा स्पर्श करण्याला प्राधान्य द्या.

डर्टी टॉक

तुम्ही पार्टनरला स्पर्श करता असतानाचा डर्टी टॉक करू शकता. यामध्ये आपल्या पार्टनरच्या सेक्श्युअल फॅंटसीज बाबत बोलू शकता. यामध्ये तुमच्या पार्टनरचा कम्फर्ट किती आहे याचा आधी अंदाज घ्या. XXX Video: आपल्या जोडीदारासोबत पॉर्न व्हिडिओ पाहिल्याने Sex Life मध्ये होऊ शकतात 'हे' फायदे

Moaning

जवळपास सर्वच पुरुषांना सेक्स दरम्यान महिलेने मादक आवाज काढल्यास उत्तेजित वाटते, अर्थात ही एक प्रक्रिया आहे त्यासाठी तुम्ही सेक्स एन्जॉय करणे महत्वाचे आहे. ज्यामुळे हे आवाज आपोआपच तुमच्या तोंडुन निघतात,यावेळी पार्टनरचे नाव घेतल्यास हा बोनस पॉईंट ठरतो.

डोळ्यात पहा

सेक्स करताना बऱ्याचदा महिला डोळे बंद करून घेतात. पण पुरूष जोडीदारांना त्यांचे डोळे आणि त्या डोळ्यात त्यांच्याविषयी असणारं आकर्षण पाहायचं असतं. त्यामुळे थेट डोळ्यात बघा.

सेक्स ही एक प्रोसेस जरी असली तरी ती उत्सुकतेने आणि मजेने करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पार्टनर सोबत एकुणच कम्फ़र्टेबल असायला हवे. आणि यात एक बोनस सल्ला म्हणजे सेक्स मध्ये प्रयोग करा, एकाच पोझिशन मुळे ते रुटीन बनवुन ठेवु नका.

(टीप: वरील लेख हा केवळ सल्ला आहे ज्याचा आपल्या पार्टनरशी बोलुनच अवलंबण्याचा विचार करा.)