प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : youtube)

गेल्या काही वर्षांमध्ये आपली लाईफस्टाईल खूपच बदलून गेलेली आहे. लोकांना हल्ली अजिबात वेळ मिळत नाही. मात्र या बिझी लाईफस्टाईलचा परिणाम सेक्स लाईफवरही होत आहे. आपल्याकडे कधीही खुलेपणाने सेक्सवर काही बोलले जात नाही. महत्वाचे म्हणजे, आपल्या खाण्यापिण्याचा सेक्स लाईफवर परिणाम होतो की नाही? याची प्रत्येकालाच माहिती असणे गरजेचे आहे. शाररिक संबंध ठेवण्याआधी आपण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत? हे जाणून घेणे फायदेशीर ठरणार आहे. अनेकदा आपल्याला पार्टनरसोबत शाररिक संबंध ठेवताना अडथळा येतो. याला तुमचे रात्रीचे जेवणही कारणीभूत ठरू शकतो. कारण, अनेकदा रात्रीच्या सुमारास काहीजण अशा काही गोष्टी खातात ज्याचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफवर म्हणजेच शारीरिक संबंध ठेवताना होतो. अनेकदा असे काही पदार्थ असतात जे खाल्ल्यामुळे तुमच्या पार्टनरचा मुड खराब होतो. यासाठी खालील माहिती तुमच्या फायद्याची ठरणार आहे.

जेवणात अधिक मिठाचा समावेश-

फ्रेंच फ्राईज, पॉपकॉर्न यांसारख्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण हे सामान्यपेक्षा अधिक असते. मीठाचा अतिरेक झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे पोटात मळमळ होण्यास सुरुवात होते. जास्त प्रमाणात मीठाचं सेवन हे उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरु शकतं. या सर्वांचा परिणाम तुमच्या सेक्सुअल लाईफवर होतो.

दारूचे सेवन-

अनेकांना असे वाटते की, बिअर किंवा वाईन पिल्यास आपल्या जोडीदाराला रोमॅन्टिंक बनवेल. पण तसे काहीही नसते. अल्कोहोल घेतल्यानंतर झोप देखील येऊ शकते. बिअर किंवा वाईनमुळे शरीरात नेलाटॉनिन वाढते जो स्लीप हार्मोन आहे. यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

कॉफी- 

आपल्या शरीरात एक हार्मोन आहे. कॉर्टिसॉल, ज्यामुळे आपला ताण वाढतो. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे हे हार्मोन वाढते. कॅफिन हे तुमची कामुकता कमी करते. त्यामुळे जेवल्यानंतर कॉफी पिण्याची सवय सोडून द्या.

सोयाबिनचे घातक परिणाम-

पुरुष असो किंवा महिला, शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी चांगली असणं आवश्यक असतं. सोया शरीरातील हार्मोन्सला असंतुलित करू शकतो. वैद्यकीय संशोधनात असे सुचवण्यात आले आहे की, जर पुरुष दिवसातून १२० मिलीग्रॅमपेक्षा जास्त सोयाचे सेवन करतात तर त्यांचे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होते. म्हणून सेक्स करण्यापूर्वी ते न खाण्याचा सल्ला दिला जातो.

गॅसची समस्या उद्भवणार नाहीत अशा भाज्या टाळाव्यात

जेवल्यानंतर अनेकांना पोटात दुखण्याची समस्या जाणवते. चुकीच्या खाण्यामुळे गॅस सारख्या समस्या लैंगिक संबंधात अडथळा आणतात. फ्लॉवर, स्पाउट्स सारख्या भाज्या मिथेन तयार करतात. म्हणजेच जर या भाच्या खायच्या असतील तर त्या फार चांगले शिजवणे आवश्यक आहे. जेणेकरुन गॅसचा त्रास जाणवणार नाही आणि तुमची सेक्स लाईफ उत्तम चालेल.

सेक्स लाईफ एन्जॉय करण्यासाठी एनर्जी लेव्हल चांगली असणे गरजेचे असते. यासाठी आपल्याला प्रोटीनयुक्त डाएट घेतला पाहिजे. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही मच्छी आणि अंड्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीराला एनर्जी मिळते.सेक्स पॉवर कायम राखण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी अधिकाधिक नैसर्गिक पदार्थांचे सेवन करा. हिरव्या भाज्या, सलाडचा आहारात समावेश करा.तुम्हाला रोजच्या आहारात डाळ-भात खायला आवडतो का? तसे असेल तर, हा आहारही प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सनी उपयुक्त असा आहे. मात्र, आहारामध्ये बिना पॉलिश डाळ आणि तांदूळ खा.

(नोट: वरील मजकूर प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे लेटेस्टली याची कोणतीही पुष्टी करत नाही.)