Sex Tips After First Child: पहिल्या बाळानंतर सेक्स करताना येतात का अडचणी? ट्राय करा 'या' हटके टिप्स
Sex TIps After first Baby (Photo Credits: Unsplash)

विवाहित जोडपी (Married Couple) जेव्हा दोघांचे तीन होतात म्हणजेच जेव्हा त्याच्या आयुष्यात तान्हुल्याचे आगमन होते तो काळ त्यांच्यासाठी जितका स्पेशल असतो तितका अवघडही असतो. कारण तेव्हा एका बाळाचे आई-वडिल झालेले असतात. अशा वेळी त्याच्या खाण्या-पिण्याच्या वेळा, त्याच्या झोपण्याच्या वेळा यानुसार या जोडप्यांना आपले वेळापत्रक बनवावे लागते. थोडक्यात त्यांचा संपूर्ण विश्व त्या बाळाने व्यापून जाते. त्यामुळे सेक्स (Sex) करायला वेळेतच मिळत नाही वा खूप दमलेलो असतो त्यामुळे शक्य होत नाही अशा तक्रारी अनेक जोडप्यांकडून ऐकायला मिळतात. अशा वेळी सेक्सला वेळ कसा द्यावा अशी मोठी समस्या त्यांच्यासमोर निर्माण होते.

अनेक जोडप्यांकडे वेळ जरी असला तरी बाळ आपल्यासोबत वा पती-पत्नीच्या मध्ये झोपत असल्याकारणाने अनेकांना अशा परिस्थितीत सेक्स करणे आवडत नाही. अशा वेळी काही हटके आणि डोकेबाज आयडियाज शोधून तुम्ही सेक्सचा अनुभव घेऊ शकता.

1. बाळाची झोपण्याची वेळ पाहा

बाळ रात्री कधी झोपतो हे जरा नीट पाहा. किंवा तुम्ही त्यानुसार त्याच्या इतर खाण्या-पिण्याच्या वेळा ठरवून त्याला झोपवा. एकदा का तुमची खात्री पटली की बाळ गाढ झोपलंय तेव्हा तुम्ही तुमच्या पती-पत्नीसोबत सेक्स करु शकता. Intense Orgasm Tips: सेक्सपूर्वी फोरप्ले दरम्यान जोडीदाराच्या स्तनांसह 'या' संवेदनशील जागांना स्पर्श करुन घ्या ऑर्गेजमचा आनंद

2. जर तुम्ही कुटूंबासोबत राहत असाल तर अधूनमधून त्याला घरातील अन्य व्यक्तीसोबत झोपवा.

3. जर तुम्ही घरात तिघेच असाल तर बाळ झोपल्यानंतर तुम्ही अन्य खोलीत जाऊन सेक्स करु शकता. जेणे करुन सेक्स दरम्यान जरी आवाज झाला तरी बाळ उठणार नाही.

4. शक्यतो बाळाची झोपण्याची वेळ समजून मध्यरात्री वा पहाटे सेक्स केल्यास तुम्हाला सेक्सचा चांगला आणि दीर्घकाळ अनुभव घेता येईल.

या सर्वांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुमच बाळ हळूहळू मोठं होत जात तेव्हा सेक्स करतान खूप काळजी घ्या. लहान मुलांच्या कोवळ्या मनाचा विचार करुन सेक्ससाठी योग्य ठिकाण आणि योग्य वेळ समजून घेणे फार गरजेचे आहे.