जर तुम्हाला आरोग्यासंबंधी वा त्वचेसंबंधी काही समस्या असतील तर तुम्हाला तुमची सेक्स लाईफ चांगली एन्जॉय करता येत नाही. उत्तम सेक्स लाईफ (Sex Life) साठी तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही रोज अनेकदा तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारात काही बदल करा, नियमित व्यायाम करा यांसारखे सल्ले डॉक्टर देतात. या सोबत तुम्ही काही ठराविक फळांचा रस प्यायलात तुमची सेक्स लाईफ उत्साही आणि निरोगी (Healthy Sex Life) ठेवण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जर एखादी भाजी आवडीने खात नसाल तर तुम्ही त्याच्या जागी फळांचा रस (Fresh Juice) पिऊन तुमची सेक्स लाईफ चांगली करू शकतात.
पण याचा अर्थ असा नाही कोणतीही फळे खाल्ल्याने तुमची सेक्स लाईफ सुधारेल. बाजारात अशी काही ठराविक फळे आहेत जी खाल्ल्याने तुम्ही तंदुरुस्त राहता आणि त्यामुळे सेक्स लाईफ देखील तितकीच आनंदी आणि निरोगी बनते.
सेक्स लाईफ सुधारण्यासाठी 'या' ज्यूसेसचे करा सेवन
1. गाजर- गाजराचा ज्यूस करुन प्यायल्याने पुरुषांना यौन संबंधी असलेल्या आजारांशी लढण्याची ताकद मिळते आणि तुमच्या कामेच्छा सुधारण्यास मदत करते.
2. सेलरी- ही भाजी मिळणे थोडं अवघड आहे. मात्र याचा ज्यूस करुन पिणे शरीरास खूपच फायदेशीर ठरते. बेडरूममध्ये तुमच्या पार्टनरसोबत संभोगोदरम्यान उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी याचा ज्यूस खूप फायदेशीर ठरतो. सेलरीमध्ये कामोत्तेजर गुणांना वाढविण्याची क्षमता आहे.
3. टरबूज- टरबूजमध्ये एल-सिट्रुललाईन (L-citrulline) नावाच्या अमीनो एसिड प्रचुराचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे तुम्हाला इरेक्शनला मजबूत ठेवण्यासाठी मदत होते. यामुळे तुमच्या जननांग क्षेत्रातील रक्त प्रवाह वाढतो.
4. डाळिंबाचा रस- यामध्ये एंटीऑक्साडेंट चे प्रमाण अधिक असते जो तुमचा रक्तप्रवाह सुरळित करतो. इरेक्टाइल डिसफंक्शनशी सामना करण्यासाठी हा ज्यूस पिणे खूप फायद्याचा ठरतो.
5. कोरफड ज्यूस- शोध के अनुसार, एलोवेरा ज्यूसमध्ये टेस्टोस्टेरोनच्या क्षमता वाढविण्यास मदत होते. ज्यामुळे पुरुषांमध्ये लिबिडिनल ड्राइव आणि यौन ऊर्जा वाढवण्यास मदत होते.
ही फळं आणि भाज्यांचा रस प्यायल्यास तुमची सेक्स लाईफ सुधारते आणि संभोगादरम्यान चांगला अनुभव येतो. सध्याची परिस्थिती ही कोरोनामुळे थोडी त्रासदायक झाली आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी स्वत: घेऊन तुम्ही तुमची सेक्स लाईफ चांगली आणि सुरळीत ठेवू शकता.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही केवळ आरोग्याशी संबंधित माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी याचा आधार घेऊ नये. आम्ही असा दावा करू शकत नाही की, लेखात नमूद केलेल्या टिप्स उत्तम प्रकारे कार्य करतील, म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)