Lockdown: अरे बापरे...! क्वारंटाईन असलेल्या नवऱ्याची बायको प्रियकरासोबत पळाली
Wife Runs Away |

राहत्या घरी क्वारंटाईन (Quarantine) असलेल्या एका स्थलांतरित व्यक्तिची बायको प्रियकरासोबत पळाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. मध्यप्रदेश राज्यातील छत्तरपूर (Chhatarpur) जिल्ह्यात ही घटना घडली. 50 वर्षीय पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. आपण घरामध्ये क्वारंटाईन असताना आपली पत्नी (वय वर्षे 46) तिच्या प्रियकरासोबत पळाल्याचा दावा तक्रारदार पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. दरम्यान, बेपत्ता झालेली महिला तीन मुलांची आई आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदार असलेला 50 वर्षीय व्यक्ती हा दिल्ली येथे बांधकाम मजूर आहे. दो दिल्ली येथे मजूरी करत असे. पत्नी आणि तीन मुलांना दीड वर्षांपूर्वीच आपल्या गावी पाठवले होते. दरम्यान, कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन लागू झाल्यामुळे 19 मे 2020 या दिवशी तो श्रमिक स्पेशल ट्रेनने आपल्या घरी (Munderi Villag) परतला. घरी परतल्यामुळे नियमानुसार त्याला होम क्वारंटाईन व्हावे लागले.

संबंधित व्यक्तिचे घर दुमजली आहे. पत्नी आणि तीन मुले ही खालच्या मजल्यावर राहात. तर, होम क्वारंटाईन असलेला पती हा वरच्या खोलीत क्वारंटाईन होता. दरम्यान, ही घटना घडली त्या दिवशी (24 मे 2020) सकाळी पती झोपेतून उठला तर त्याला घराचा दरवाजा बाहेरील बाजून बंद दिसला. त्याने धडपड करुन दरवजा उघडला आणि खाली आला तर पत्नी आणि मुले राहात असलेल्या खोलीचा दरवाजाही बाहेरून बंद दिसला. (हेही वाचा, केरळ: प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी 'त्याने' पत्नीच्या अंगावर कोब्रा आणि रसेल व्हायपर साप सोडुन केली हत्या; पोलीस तपासात दिली कबुली)

दरम्यान, पतीने खालच्या खोलीचा दरवाजा उघडला तर आत मुले झोपली होती. त्याने मुलांना विचारले तर त्यांनाही काही सांगता आले नाही. अखेर पतीने चेहऱ्याला चादर गुंडाळून शेजाऱ्यांचा दरवाजा ठोठावला व चौकशी केली. तरीही हाती काहीच लागले नाही. शोध घेऊनही पत्नीचा तपास न लागल्याने त्याने पोलिसांत तक्रार दिली.