प्रेम आणि नात्यामधील 'या' काही गोष्टी ज्या फक्त ब्रेकअप नंतर समजतात
Break Up | (Photo credit: archived, edited and Symbolic images)

प्रियकरांच्या नात्यामधील भांडण काही वेळेस ब्रेकअप पर्यंत पोहचते. त्यामुळे ब्रेकअप झाल्यानंतर ज्या परिस्थितीतून प्रेमी युगुल जातात त्याचा अनुभव फार वाईट असतो असे म्हटले जाते.काही जण ब्रेकअप नंतर एवढे आतमधून तुटले जातात की त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी त्यांना फार वेळ लागतो. ब्रेकअप प्रेम आणि नात्यामधील बऱ्याच गोष्टी शिकवून जातो.प्रेमात आंधळ्या झालेल्या प्रत्येकाला त्यांचा पार्टनर परफेक्ट असल्याचे वाटते. एकमेकांना डेटिंग करतानाच्या दरम्यान दोघांना एकमेकांच्या सर्व चांगल्या गोष्टी दिसून येतात. परंतु काही वेळेस पार्टनरच्या वाईट गोष्टींबाबत दुर्लक्ष केले जाते. ब्रेकअपनंतर याचा उलगडा होतो की, वास्तवात मिस्टर राइट किंवा मिसेस राइट नसतो. त्यामुळे चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे टाळा.

नात्यात दुरावा आल्याने काही जण ज्या गोष्टीवरुन वाद होतात ती गोष्ट धरुन ठेवतात. तर काही जणांना आपण चुकीचा पार्टनर निवडला असल्याचा पश्चाताप सुद्धा होतो. त्यामुळे जर नात्यात वारंवार होत असल्यास काही जण ब्रेकअप करणे पसंद करतात. तसेच सध्या बदलत्या काळानुसार नातेसंबंधाची व्याख्या सुद्धा बदलत चालली आहे. त्यामुळे काहीजण एखाद्या नात्यात असतानाही दुसऱ्या व्यक्तीला पसंत करु लागतात. त्यामुळे हे एक कारण ब्रेकअपसाठी ठरु शकते. एकमेकांबाबत गैरसमज असल्यास नात्यात अधिक तणाव वाढतात.(अरेंज मॅरेजची भीती? ठरवून होणाऱ्या लग्नासाठी होकार देण्याआधी या 5 गोष्टींचा विचार नक्की करा)

ऑफिस ते घरापर्यंत मुलामुलींना समान हक्क दयावे असे म्हटले जाते. पण रिलेशनशिप मध्ये असलेला प्रत्येकजण अशी आशा करतात की दोघेही समान भुमिका पार पाडू शकतो. मात्र प्रत्येक वेळी ही गोष्ट संभव नसते. ब्रेकअप नंतर तुम्ही काही गोष्टींबाबत निर्णय घेण्यासाठी समर्थ असतात. तुम्हाला जर नाते जपून ठेवायचे असल्यास पार्टनरचा विश्वास तुटणार नाही याकडे प्रामुख्याने लक्ष द्या, तसेच वरील काही कारणांमुळे तुम्हाला नात्यात दुरावा येत असल्याचे जाणवल्यास त्यासंबंधित पार्टनरसोबत आपले मत व्यक्त करा.