LGBT Representational Image (Photo Credits: Pixabay)

पंजाब (Punjab) राज्यातील अमृतसर (Amritsar) जिल्ह्यातील एक तरुण लिंगबदल (Sex Reassignment Surgery) करुन चक्क महिला बनला आहे. विशेष म्हणजे या तरुणाने हे केवळ एवढ्याचसाठी केले आहे की, त्याला आपल्या तरुण मित्रासोबत लग्न (LGBTQ Marriage) करायचे होते. या तरुणाच्या निर्णयाची आणि कृतीचीही परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रसारमाध्यमांनीही या तरुणाची दखल घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार, तरुणाचे नाव रवि असे होते मात्र लिंगबदल झाल्यावर त्याने रिया असे नाव धारण केले. आता इतके सगळे झाल्यावर ज्या मित्रासाठी लिंगबदल करुन घेतला तो मित्रच आता रियाला स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे रियाने पोलिसांमध्ये फसवणुकीची तक्रार दिली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लिंगबदल करुन रविचा रिया झालेला तरुण अमृतसरचा आहे. तर लग्नास नकार देणारा आणि रियाला नाकारणारा तरुण हा जालंधर जिल्ह्यातील जंडियाला गावचा रहिवासी आहे. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांकडून या तरुणाचा शोध सुरु आहे. जालंधर येथे नोकरी करताना रवि हा जंडियाला येथे राहणाऱ्या अर्जुन याच्या संपर्तात तीन वर्षापूर्वी आला. दोघांमध्ये दोस्ती आणि पुढे प्रेम निर्माण झाले. दोघांमध्ये समलैंगिक संबंध निर्माण झाले. त्यानंतर लिंगबदल करुन रविने स्वत:ला रिया केले. जेणेकरुन समाजामध्ये अर्जुनसोबत राहताना कोणतीही अडचण येऊ नये. मात्र, आता अर्जुन हा रियाला स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे रियाने अमृतसर येथे जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. (हेही वाचा, Lesbian Friendship: समलैंगिक मैत्रिणीचा लग्नास नकार, व्याकूळ तरुणीचे औरंगाबाद पोलिसांना साकडे)

रियाने सांगितले की, अर्जुनेच त्याला लिंगबदल करुन रिया जट्टी हे नाव धारण करण्यास सांगितले. दोघांनी तीन वर्षांपूर्वी विवाहसुद्धा केला होता. अर्जुन याच्या कुटुंबानेही त्याला (रिया) स्वीकारले होते. मात्र आता अर्जुनच त्याला स्वीकारण्यास तयार नाही, असा दावा करत रियाने अर्जुनवर आरोप केेला आहे तो आता रियाला किन्नरकडे सोडू इच्छितो.

प्रकरणाचा तपास करत असलेल्या इन्स्पेक्टर जसबीर सिंह यांनी सांगितले की, रिया जट्टी हिच्याकडून त्यांना तक्रार मिळाली आहे. रवि याने आपले लिंगबदल करुन रिया नाव धारण केले. प्रकरणाचा तपास करुन तक्रारदार आणि आरोप असलेला व्यक्ती दोघांना बोलवून लवकरच संवाद केला जाईल. जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.