पोलीस स्टेशन म्हटले की गुन्हे, तक्रारी आणि तक्रारदार हे ओघानेच आले. पण, औरंगाबाद पोलिसांकडे एक अशी तक्रार आली. जी आजवर औरंगाबाद पोलीस (Aurangabad Police) स्टेशन दप्तरी कधीच नोंदवली गेली नव्हती. मामला नाजूक होता. दोन तरुणींच्या एकमेकांवरील निस्सीम प्रेमाचा, नाजूक नात्याचा आणि नात्यात झालेल्या फसवणुकीचा. होय, हे प्रकरण समलैंगिक (Lesbian Friendship) प्रेमसंबंधातील होते. त्याचे झाले असे, दोन लेस्बीयन (Lesbian) तरुणींमध्ये मैत्री झाली. त्यातून त्यांचा एकमेकांवर जीव जडला. प्रेम झाले. पण पुढे त्या दोघींमधील एकीने दुसरीला लग्नाची मागणी घातली. जी दुसरीने फेटाळून लावली. त्यातूनच दोघींमध्ये वाद निर्माण झाला आणि तो चक्क पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला.
लेस्बीयन असलेल्या त्या दोघी औरंगाबाद येथे एकाच वसाहतीमध्ये राहतात. दोघीही एकाच महाविद्यालयात शिकत होत्या. त्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. पुढे ती अधिकच दृढ होत गेली. त्यातून दोघींच्या गाठीभेटी अधिक वाढल्या. इतक्या की एकमेकींच्या घरीही येणेजाणे कायम झाले. पुढे एकमेकींच्या मैत्रीचा सहवास पुढे समलिंगी संबंधांपर्यंत पोहोचला. दरम्यान, दोघींमधील एकीने दुसरीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यासाठी ती दुसरीवर लग्नासाठी वारंवार दबावही टाकू लागली. त्यातून एकीच्या मनात विचार आला की, या नात्यात आपली जोडीदा आपल्यावर अधिकच अधिकार गाजवत आहे. मैत्रिणीच्या वारंवारच्या लग्नाच्या तगाद्याला वैतागून तीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आपल्यापासून आपल्या जोडीदारणीचे वेगळे होणे दोघीतील एकीला मान्य झाले नाही. दुसऱ्या बाजूला लग्नासाठी तागादा सुरुच होता. लग्नाचा तगादा लावताना ती इतकी टोकाला गेली की, एकमेकींच्या सहमतीने खासगी आनंद घेताना काढलेले अगदीच खासगी प्रसंगांचे फोटो तीने सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तिच्या या धमकीमुळे ती हादरुन गेली. त्यामुळे तणावात असलेल्या मैत्रणीने पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान, आपल्याच मैत्रीणीविरोधात फसवणुकीची तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीची समजूत काढत पोलिसांनी दोघींचेही समुपदेशन केले. सामोपचाराने हे प्रकरण मिटवले. त्यामुळ तक्रार दाखल झाली नाही. (हेही वाचा, Homosexuality Disease: समलैंगिकता हा एकप्रकारचा आजार', मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांचा दावा; IPS कडून चौकशीचे आदेश)
औरंगाबादमधील क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.जी. एस. दराडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला हे प्रकरण जेव्हा पोलिसांकडे आले तेव्हा पोलीसही काहीशे चक्रावले. कारण, यापूर्वी या पोलीसस्टेशनमध्ये अशा प्रकारची तक्रार कधीच आली नव्हती. तरीही महिला पोलिसांनी या तरुणींचे समूपदेशन करुन दोघींचीही समजूत घातली. पोलिसांनी दोन्ही तरुणींच्या आई-वडीलांना बोलवून दोघींबद्दल कल्पना दिली आणि हे प्रकरण सामोपचाराने मिटवीण्यात आले.