Bodybuilder Divorced Sex Doll Wife: बॉडीबिल्डर Yurii Tolochko याचा सेक्स डॉल पत्नीसोबत घटस्फोट
Bodybuilder Yurii Tolochko | (Photo Credits: Instagram)

सेक्स डॉल (Sex Doll) सोबत विवाह केल्यामुळे चर्चेत आलेला आणि सोशल मीडियात भलताच व्हायरल झालेला बॉडीबिल्डर युरी टोलोको (Yurii Tolochko) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या आधी त्याच्या विवाहाची चर्चो होती. आताची चर्चा त्याच्या घटस्फोटाची आहे. Yurii Tolochko हा मुळचा कझाकिस्तान (Kazakstan) देशाचा रहिवासी आहे. गेल्याच वर्षी (2020 ) त्याने सेक्स डॉल सोबत लग्नगाठ बांधल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. Margo नावाच्या एका जोडीदाराने 2019 मध्ये प्रश्न विचारल्यानंतर Tolochko याने सेक्स डॉलसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये त्याने सेक्स डॉल सोबत विवाह केल्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. जी पुढे व्हायरलही झाली.

Yurii Tolochko याचा विवाह कोरोना व्हायरस महामारीमुळे (Coronavirus Pandemic) आगोदर लांबणीवर पडला होता. त्यातच ऑक्टोबर 2020 मध्ये एका ट्रान्सजेंडर रॅलीदरम्यान (Transgender Rally) त्याच्यावर हल्ला झाला होता. अखेर तो आणि त्याचा Silicone Partne नोव्हेंबर 2020 मध्ये पुरुष आणि पत्नी झाले. (हेही वाचा, Sex During Coronavirus: कोरोना व्हायरसच्या काळात Sex Dolls च्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ; जाणून घ्या Blow up ते Silicone सेक्स डॉलचे प्रकार आणि त्यांची माहिती)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, Tolochko हा Margo सोबत साधारण आठ महिने रिलेशनशिपमध्ये होता. दुर्दैवाने ही रिलेशनशीप फार काळ टिकू शकली नाही. Tolochko याने अलिकडेच याबाबत भाष्य केले. मार्गोसोबत आपले संबंध आगोदरच ताणले होते कारण ती तूटली होती. ती दुरुस्तीसाठी दिली खरी. परंतू, त्यालाही फार विलंब लागला. ज्यामुळे हे संबंध पुढे सुधारण्यापलीकडे गेले. परिणामी मी रिलेशनशिपसाठी इतर काही पर्यायांचा अवलंब केला.

दरम्यान, Tolochko याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या फॉलोअर्सला आपल्या नव्या पत्नीची ओळख करुन दिली. जीचे नाव 'Lola' असे होते. इन्स्टाग्राम व्हिडिओ मध्ये त्याने म्हटले की, मी माझ्या नव्या पत्नीची आपल्याला ओळख करुन देतो. तिचे नाव आहे लोला क्विर ( Lola queer). तिने अद्याप तिच्या लैंगिक ओळखीबाबत निर्णय घेतला नाही. ती स्वत:चा शोध घेत आहे.