लिपस्टिक लावलेल्या स्त्री च्या ओठांना किस करणे शरीरासाठी असते घातक? जाणून घ्या यामागील सत्य
lipstick (Photo Credits: Pexels)

बदलत्या काळाप्रमाणे स्वत:ला बदलण्यासाठी तसेच स्वत:चे व्यक्तिमत्व आणखी खुलवण्यासाठी स्त्रिया वेगवेगळी सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. यात स्वत:चा चेहरा चमकदार बनविण्यासाठी वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांचा आपल्या चेह-यावर भडिमार करतात. यात स्त्रीचे सौंदर्य खुलविणारे त्यांचे सुंदर, नाजूक ओठ हे तिच्या व्यक्तिमत्वाला चार चांद लावतात. अशा ओठांवर लाल, गुलाबी रंगाची लिपस्टिक (Lipstick) ही तितकीच सुंदर दिसते. मात्र एखाद्या स्त्री ला किस करताना ब-याचदा पुरुष टाळाटाळ करतात. किंवा कधी कधी स्त्री किंवा तरुणी या गोष्टीला नकार देतात. याचे मूळ कारण म्हणजे ओठांवर किस करताना त्या लिपस्टिकमधील केमिकल्स आपल्या शरीरात जाऊन त्यांचा विपरित परिणाम होऊ नये हे असते.

मात्र जर या गोष्टीमुळे जर तुम्ही स्त्री च्या गुलाबी ओठांवर किस करणे टाळत असाल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात. तुमच्या या गोष्टीला आमचा विरोध नाही. तुम्ही तुमच्या जागी बरोबरही आहात. प्रत्येकाला सर्वात आधी आपले आरोग्य महत्वाचे आहे. लिपस्टिक लावलेल्या ओठांवर किस करणे हे नक्की घातक आहे की नाही याबाबत आम्ही थोडी माहिती देणार आहे.

लिपस्टिकमध्ये काय असते?

लिपस्टिक हा सौंदर्यप्रसाधनांचा एक भाग आहे. यात बरीच केमिकल्स, अॅल्युमिनियम, कॅडमियम, क्रोमियम, मॅग्नेशियम सारखी घातक द्रव्ये असतात. मात्र ब-याच कंपन्या आम्ही आपल्या लिपस्टिकमध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल्स न वापरता बटर, अॅवोकाडो तेल, बीसवॅक्स इत्यादी नैसर्गिक द्रव्ये वापरत असल्याचा दावा करतात. पण त्यात मिश्रीत केलेल्या केमिकल्सचा उल्लेख देखील करत नाही.

लिपस्टिक मध्ये वापरलेल्या कोणत्या द्रव्यामुळे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो?

बाजारात मिळणा-या काही लिपस्टिकमध्ये न्यूरोटॉक्सीन सारखी घातक द्रव्ये वापरली असतात. यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरात भाषेची समस्या, व्यंग, बुद्धीची वाढ खुंटणे यांसारख्या गंभीर आजार होतात. त्यामुळे शक्यतो रोज किंवा वारंवार लिपस्टिक वापरणे टाळावे.

हेदेखील वाचा- Sex Life ची सुखावह आठवण देणारे 'Love Bites' लपवण्यासाठी करा हे उपाय

किस करण्याआधी ओठांवरील लिपस्टिक पुसली पाहिजे का?

2015 च्या सर्वेनुसार, कॅडिअम आणि क्रोमियम यांसारखी द्रव्ये ज्या लिपस्टिकमध्ये वापरण्यात आली आहेत अशा लिपस्टिकमुळे शरीरावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे कधीतरी अशी लिपस्टिक लावलेल्या ओठांवर किस करायला काही हरकत नाही.

तरीही तुमच्या मनात काही शंका असेल तर शरीर स्वास्थ्यासाठी तुम्ही हे टाळू शकता अथवा किस करण्यापूर्वी ओठांवरील लिपस्टिक पुसून टाकणेही सोयीचे ठरू शकते. कारण प्रश्न हा केवळ लिपस्टिकचा नाही तर त्या गुलाबी क्षणाचा असतो जो आयुष्यात कधी कधी येतो.

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)