मेट्रिमोनियल साईट्सवरील प्रोफाईल खरे की खोटे 'या' मार्गाने तपासून पहा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्याची जनरेशन खासकरुन प्रेमविवाह करणे पसंत करतात. मात्र तरीही काही जणांना आपल्या घरातील मंडळींनी लग्नासाठी सुचवलेले स्थळ योग्य असेल असे वाटते. लग्न करण्यापूर्वी नाते संबंध जोडण्यामध्ये नातेवाईकांचे मोठे योगदान असते. मात्र बदलत्या काळानुसार ही जागा सध्या मेट्रिमोनियल साईट्स यांनी घेतली आहे. त्यामुळे तरुण-तरुणी विवाहसाठी एखादा वर किंवा वधू शोधण्यापूर्वी मेट्रोमोनियल साईट्सवरील प्रोफाईल तपासून पाहतात. या अशा पद्धतीच्या साईट्सवर देशभरातील विविध व्यक्ती एकमेकांसोबत जोडल्या जातात. मेट्रोमोनियल साईट्सवर बहुतांश खरी माहिती देणारे प्रोफाईल असतात. परंतु काही वेळेस खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक केली जाते.

-जर तुम्हाला मेट्रोमोनियल साईटवर एखाद्या व्यक्तीची रिक्वेस्ट आल्यास आणि त्यावर व्यक्तीचा फोटो नसल्यास अशा प्रोफाईल पासून दूर रहा. कारण अशा प्रकारचे प्रोफाईल तुम्हाला गोत्यात आणू शकतात.

-एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाईलवरील फोटोवर जरा अधिक लक्ष द्या. कारण काहीजण आपण सुंदर दिसावे म्हणून फोटो एडिट करुन लावतात. त्यामुळे तुम्हाला अशा प्रोफाईल बाबत काही प्रश्न असल्यास त्याचे निरसन करा.

-मेट्रिमोनियल साईटवर आपले प्रोफाईल तयार करताना खरी माहिती देणे अनिवार्य असते. मात्र जर समोरच्या एखाद्या गोष्टीबाबात तुम्हाला शंका असल्यास त्याबाबत विचार करा किंवा अन्य दुसरे प्रोफाईल पहा.

-रिसर्च मध्ये असे समोर आले आहे की, ज्या व्यक्ती मेट्रिमोनियल साईट्सवर वारंवार आपला प्रोफाईल फोटो किंवा अन्य काही गोष्टीत बदलाव करत असल्याचे दिसून आल्यास ते प्रोफाईल खोटे असल्याचे समजावे.(Shubh Vivah Muhurat 2020: आगामी वर्षभरात विवाह मुहूर्ताची चंगळ; इथे पहा संपूर्ण यादी)

तसेच काही वेळेस मेट्रिमोनियल साईट्सवर फेक प्रोफाईल बनवून व्यक्तीला भेटल्यावर त्या काही गोष्टी वाढवून चढवून सांगतात. मात्र खरे तसे त्यांच्याबाबत नसतेच. यामुळे एकमेकांबाबत गल्लत होऊन आपण एखाद्याच्या रंजकात्मक गोष्टींमध्ये भुलतो. त्यामुळे अशा वेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीबात तुमचे स्पष्ट मांडा. मेट्रोमोनियल साईट्सवरील एखादी व्यक्ती तुम्हाला पसंत पडल्यास त्या व्यक्तीला घरातील मंडळींची सुद्धा गाठभेट घालून देणे विसरु नका.