Hindu Vivah Muhurat 2020 Dates: आज ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 2020 या वर्षाचा पहिला दिवस आहे. आजपासून अनेक नव्या गोष्टींची सुरूवात केली जाते. यंदा तुमच्याकडेही लग्नाचा बार उडवून देण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी खूषखबर आहे. आजपासून सुरू होणार्या वर्षात लग्नाचे मुहूर्त मोठ्या प्रमाणात आहेत. पंचांगकर्त्यांनी यावर्षींपासून गुरु-शुक्र अस्त कालात आणि चतुर्मासात काढीव गौण विवाह मुहूर्त देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात भरपूर विवाह मुहूर्त असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. Wedding Special Ukhane For Bride: नव्या नवरीने घ्यायचे 'हे' हटके उखाणे लग्न सोहळ्यातील विधींसाठी आहेत बेस्ट पर्याय.
जानेवारीमध्ये हिंदू कॅलेंडरनुसार, पौष महिना असल्याने या महिन्यात विवाह करणं, विवाहा संबंधित काही संस्कार टाळण्याची प्रथा आहे. मात्र 24 जानेवारीला पौष महिना संपत असल्याने त्यानंतर 2020 मधील विवाह मुहूर्त सुरू आहेत. गुरु-शुक्र अस्त काल आणि चतुर्मास वगळताही यंदा सुमारे 50 विवाह मुहूर्त आहेत.
2020 मधील विवाह मुहूर्त कोणते?
जानेवारी 2020: 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 29, 30 व 31
फेब्रुवारी 2020: 3,4,5,9, 10, 11,12, 13, 14, 15, 16, 17, 18 ,19, 20, 21, 25, 27 व 27
मार्च 2020: 1, 2, 3, 4, 7, 8, 9, 10, 11, 12 व 13
एप्रिल 2020: 14, 15, 25, 26 व 27
मे 2020: 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 17,18, 19, 23, 24 व 25
जून 2020: 13, 14, 15, 25, 26, 27,28, 29 व 30
नोव्हेंबर 2020: 26, 29 व 30
डिसेंबर 2020: 1, 2, 6, 7,8, 9, 10 व 11
दरम्यान हिंदू पारंपारिक, धार्मिक रीतिरिवाजांनुसार, पौष महिन्याप्रमाणेच आषाढ ते कार्तिक या चातुर्मासामध्ये विवाह टाळले जातात. यंदा यामध्येही काढीव मुहूर्त जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे लग्नाळूंसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )