Happy Sex Life: सेक्स करताना सुरक्षेसोबत आरोग्याची काळजी महत्वाची; आनंददायी लैंगिक जीवन उपभोगण्यासाठी वापरा 'या' काही टिप्स
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: iStock)

सेक्स (Sex) हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे, जो प्रत्येकजण आनंदाने उपभोगण्याची इच्छा बाळगतो. वेगवेगळ्या माध्यमांद्वारे हे उघड झाले आहे की, आजकाल सेक्सची क्रेझ खूप वाढली आहे. विशेषतः लहानांपासून ते तरुणांपर्यंतच्या वयोगटात लैंगिकतेची आवड अधिक दिसून येत आहे. परिणामी, नकळत अनोळखी-अनोळखी लोकांसोबत सेक्स कला जातो. यामुळे लैंगिक आजारांचा धोकादेखील वाढत आहे.

निरोगी लैंगिक आयुष्याचा थेट संबंध आरोग्याशी असतो. दैनंदिन जीवनावरही सेक्सचा प्रभाव असतो, त्यामुळे लैंगिक जीवन निरोगी ठेवणे फार महत्वाचे आहे.

कंडोमचा वापर - सेक्स करताना काही सुरक्षेबाबत काळजी घेणे महत्वाचे आहे. तुम्ही कोणासोबतही सेक्स करणार असाल, शारीरिक स्वच्छतेसोबत सेक्स करतानाही बाहेरूनही काळजी घेणे महत्वाचे आहे. यासाठी नेहमी कंडोमचा वापर करा. शक्यतो अनोळखी लोकांसोबत सेक्स करणे टाळां. सोबत तुमच्या जीवनशैलीमध्येही काही बदल घडवा ज्यामुळे तुमचे जीवन निरोगी राहील.

आहार - जर तुम्ही निरोगी असाल, तर तुमच लैंगिक जीवनसुद्धा निरोगी राहण्यास मदत होईल. म्हणून, एक संपूर्ण आणि संतुलित आहार घ्या. असा आहार घ्या ज्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक तत्वे समाविष्ट असतील. आपल्या आहारात प्रथिने, फायबर, ओमेगा -3, फॅटी अॅसीड्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे इ. समाविष्ट करणे आवश्यक आहे.

योग्य वजन - निरोगी लैंगिक जीवनासाठी तुमचे वजन देखील नियंत्रणात ठेवले पाहिजे. संतुलित आणि पौष्टिक आहाराबरोबरच तुम्ही तुमच्या वजनाचीही काळजी घेतली पाहिजे. यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता आहे. जास्त लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर बरेच आजार होऊ शकतात. (हेही वाचा: Smelly Penis: लिंगाला येणारी दुर्गंधी घालवू शकते Sex मधील मजा; जोडीदाराला खुश करण्यासाठी जाणून घ्या उपाययोजना)

जोडीदारासोबत संभाषण - चांगल्या लैंगिक आयुष्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंधाबाबत मोकळेपणाने चर्चा. सेक्स करताना जोडीदाराच्या मनात कोणतीही शंका सल्यास ती दूर करा. सेक्स दरम्यान अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्यामुळे जोडीदाराला मानसिक आणि शारीरिक त्रास होईल. यासाठी त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या. अशा प्रकारे सेक्स बाबत संभाषण ठेवून आपण एकमेकांबद्दल असलेल्या लैंगिक समस्यांना सहजपणे हाताळू शकता.

धूम्रपान, मद्यपान करू नका - निरोगी लैंगिक जीवनासाठी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, धुम्रपान व मद्यपान न करणे. सर्वेक्षण आणि संशोधनानंतर हे सत्य समोर आले आहे की, धूम्रपान व मद्यपान करण्याच्या सवयीचा लैंगिक जीवनावर परिणाम होतो. तसेच यामुळे तुमची लैंगिक शक्तीही कमी होऊ शकते. मद्यपान आणि धुम्रपानमुळे तुमच्या मेंदूवरील नियंत्रण कमी होते, यामुळे तुम्ही सेक्सचा आनंद घेऊ शकत नाही.

सोबतच ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, सेक्समध्ये कोणतीही समस्या असल्यास जाहिराती पाहून कोणतीही औषधे घेऊ नये. मनात कोणतीही शंका असल्यास डॉक्टरांशी बोलणे केव्हाही योग्य ठरू शकते.