Happy Propose Day 2019: व्हॅलेंटाईन डे आणि मधुबाला यांचे होते खास नाते, गुलाब फूल देत करायच्या हटके स्टाईल प्रपोज
Actress Madhubala, Valentine and Propose | (Photo credit: archived, edited, representative image)

Valentine’s Day 2019: प्रेमात पडलेल्यांसाठी किंवा पडू पाहणाऱ्यांसाठी हा आठवडा बराच महत्त्वाचा, धावपळीचा आणि नाट्यपूर्ण घडामोडींना भरलेला असणार आहे. कारण, 7 फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week). या सप्ताहातील पहिला दिवस अर्थातच रोज डे (Rose Day) काल (7 फ्रेब्रुवारी) पार पडला. आज या सप्ताहातील दुसरा दिवस म्हणजेच प्रपोज डे (Propose Day ) आहे. हा आठवडा आणि आजच्या दिवसाचे औचित्य साधू आज आम्ही आपल्याला बॉलिवूडची अत्यंत सुंदर आणि बहारदार अभिनेत्री मधुबाला (Madhubala) यांच्याबाबत काही किस्से सांगणार आहोत. बॉलिवूडमध्ये गॉसिपची कधीच कमी नसते. त्यामळे मधुबाला यांच्यबद्दल गॉसिप करणारे हे किस्से तोंड भरून सांगतात. गॉसिपमधील चर्चेला वास्तवाचा आधार असतोच असे नाही. त्यामुळे मधुबाला यांच्याबद्दल सांगितल्या जाणाऱ्या किस्स्यांनाही ठोस आधार सापडत नाही. परंतु, त्यांच्याबद्दल गॉसिप करणारे हे किस्से सांगतात हे मात्र खरं.

मधुबाला यांच्या सौंदर्याने भलेभलेही घायाळ

14 फेब्रुवारी (Valentine’s Day) हा अभिनेत्री मधुबाला यांचा जन्मदिवस. योगायोग असा की, व्हॅलेंटाईन डेसुद्धा याच तारखेला असतो. कदाचीत त्याचमुळे मधुबाला इतक्या रोमँटीक असाव्यात. सांगितले जाते की, मधुबाला या ज्या अभिनेता किंवा दिग्दर्शकासोबत काम करत त्याला त्या प्रपोज करत. काही लोक सांगतात स्वत: अभिनेते आणि दिग्दर्शकच मधुबाला यांना प्रपोज करत. खरे खोटे त्यांनाच माहिती. पण, मधुबाला यांचे सौदर्यच इतके अप्रतिम होते की, पाहताक्ष्णी कोणीही त्यांच्यावर फिदा व्हायचे.

प्रपोज करण्यासाठी मधुबाला स्टाईल

मधुबाला यांची प्रपोज करण्याची स्टाईलही अगदी हटके होती. सांगितले जाते की, प्रपोज करताना त्या एक गुलाबाचे फूल आणि त्यासोबत लेटरही द्यायच्या. एकदा तर म्हणे मधुबाला यांनी अभिनेता प्रेमनाथ यांनाही प्रपोज केले होते. प्रेमनाथ यांना प्रपोज केल्यानंतर जे घडले ते ऐकुन कदाचित आपल्यालाही धक्का बसेल. हा किस्सा साधारण 1951 च्या आसपासचा आहे. मधुबाला आणि प्रेमनाथ 'बादल' चित्रपटासाठी एकत्र काम करत होते. त्या काळातील अनेक चित्रपटांत प्रेमनाथ यांनी खलनायकाची भूमिका पार पाडली आहे. बादलच्य शुटींगचा तो पहिलाच दिवस होता. मधुबाला यांच्या मनात अचाकन काय कल्पना आली कोणास ठाऊक. त्या थेट प्रेमनाथ यांच्या मेक-अप रुममध्ये घुसल्या. त्यांच्या एका हातात गुलाबाचे फुल आणि एका हातात लवलेटर होते. जे त्यांनी प्रेमनाथ यांना दिले. (हेही वाचा, Valentine's Day 2019: प्रपोजला मिळालेला नकार कसा स्वीकाराल? लक्षात ठेवा! प्रेत्येकासाठी कोणीतरी थांबलेले असते)

मधुबालाच्या प्रपोजमुळे गडबडले प्रेमनाथ

मधुबाला असे काही करतील याची पुसटशी कल्पनाही प्रेमनाथ यांना नव्हती. त्यामुळे मधुबाला यांचा पवित्रा आणि प्रपोज यामुळे प्रेमनाथ कमालीचे गडबडले. काय चालले आहे हे त्यांना कळेच ना? त्यांनी पाकीट उघडून लेटर वाचले. त्यात लिहिले होते 'तुम्ही माझ्यावर प्रेम करता? करत असाल तर कृपया हे गुलाबाचे फूल स्वीकारा अन्यथा ते मला परत करा.' लेटर वाचून प्रेमनाथ यांना धक्काच बसला.

'हां मुझे कबूल है, मुझे कबूल है'

प्रेमनाथ यांना विश्वासच बसत नव्हता. एक अत्यंत सुंदर महिला आपल्याला प्रपोज करते आहे. धक्क्यातून काहीसे बाहेर पडत सावरलेल्या प्रेमनाथ यांनी मग ते फूल स्वीकारले आणि , 'हां मुझे कबूल है, मुझे कबूल है' असे म्हणत ते फुल आपल्या कोटावर लावले. पुढे त्यांच्या प्रेमाचे काय झाले माहिती नाही. पण, मधुबाला आणि प्रेमनाथ यांचा विषय निघाला की हा किस्सा मात्र आवर्जून सांगितला जातोच.