प्रेमात पडल्यानंतर किंवा अगदी नव्याने ओळख झालेल्या मुलीशी काय आणि कसे बोलावे हा प्रश्न बहुतांश मुलांना पडतो. तिला नेमके काय आवडेल? हे बोलू की नको? ती रागावणार तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न मुलांना भांडावून सोडतात. मात्र काही बिनधास्त मुलं आपल्या गपिष्ट स्वभावाने मुलींना आपलेसे करतात. प्रश्न उतरो तो बुजऱ्या मुलांचा. त्यांना मुलींना इंप्रेस करण्याचा फंडा काही केल्या जमत नाही. पण मुलींना नेमके काय आवडते, काय बोलल्याने त्या खूश होतील याच्या काही ट्रिक्स दिल्या तर तुमचे काम अधिकच सोपे होईल. जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्या मुलींना ऐकायला खूप आवडतात... (New Year 2020 Dating Tips: नवीन वर्षात कुणाला डेट करायचे असेल तर चुकूनही दुर्लक्षित करु नका या '5' गोष्टी)
तिच्या पॅशनबद्दल बोला
आजकालच्या मुली अत्यंत पॅशनेट असल्याने त्यांच्या पॅशनबद्दल बोललेले त्यांना नक्कीच आवडेल. तसंच पॅशनबद्दल बोलल्याने नात्याची सुरुवात विश्वासाने होईल.
कौटुंबिक मुल्यांविषयी बोला
मुलींना आपले कुटुंब, मित्रपरिवार यांच्याविषयी बोलायला आवडते. त्यामुळे तिच्या कुटुंबाविषयी किंवा मित्रमंडळीं विषयी बोलल्याने तिचे कुटुंबाचे विचार, मूल्य तुमच्या लक्षात येऊ शकतील आणि पुढे तुमचे जमेल की नाही याचाही अंदाज घेता येईल.
जीवनमुल्यांविषयी बोला
जीवनाकडे पाहण्याचा तिचा एकंदरीत दृष्टीकोन, तिचे विचार जाणून घेण्यासाठी तुम्ही या विषयावर बोलू शकता. सोशल मीडियाबद्दल बोलू शकता. म्हणजे तिच्या आयुष्यात सोशल मीडियाला नेमके किती आणि कसे महत्त्व आहे, हे देखील कळेल.
सेलिब्रेटींविषयी बोला
मुलीला कोणतातरी एक हिरो नक्कीच आवडतो असतो. कोणावर तरी तिचे क्रश नक्कीच असते ते जाणून घेण्यासाठी तरी सेलिब्रेटींचा विषयी नक्की काढा.
छंदाविषयी बोला
तिला कोणता छंद आहे, हे नक्की जाणून घ्या. त्या छंदामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा उलघडा होण्यास नक्कीच मदत होईल. नृत्य, वादन, गायन यापैकी तिला काय आवडतं. चित्र किंवा इतर कोणत्या कला तिला अवगत आहेत ते जाणून घ्या. तिला कोणता खेळ आवडतो, साहसी खेळांची ती चाहती आहे का? याचा अंदाज घ्या. विशेष म्हणजे तिला जी कला अवगत आहे किंवा तिचा जो छंद आहे त्याचे कौतुक करा. कौतुक केलेलं मुलींना फार आवडतं आणि त्याचबरोबर तुम्हाला तिच्या कलेचा आदर आहे, हे ही त्यातून सिद्ध होतं.
मग आता डेटवर गेल्यावर घाबरण्याचे, बुचकळ्यात पडण्याचे काहीच कारण नाही. या टिप्सच्या साहाय्याने तुम्ही नक्कीच समोरच्या मुलीला बोलते करु शकता. त्याचबरोबर तिचे विचार जाणून घेऊन तिला इम्प्रेसही करु शकता.