डिसेंबर महिना आणि थंडीची सुरुवात हे अशा प्रकारचे वातावरण आपल्या मनाला एक वेगळाच आनंद देतात. तसेच डिसेंबर महिन्यात येणारा ख्रिमस सण आणि नव वर्षाची सुरुवात यासाठी सर्वजण उत्सुक असल्याचे दिसून येते. या दिवसांमध्ये प्रेमी युगुल अत्यंत आनंदी दिसून येण्यासोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग सुद्धा करतात. मात्र एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, ख्रिसमस आणि नव वर्ष या दिवशी बहुतांश रिलेशिप्सना ब्रेक लागतो. त्यामुळेच जानेवारी महिन्यात सर्वात जास्त घटस्फोटाची प्रकरणे कोर्टात येतात.
या प्रकरणी युनिव्हर्सिटी ऑफ इसेक्स यांच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, तरुण वयातील कपल्सना त्यांच्या नात्याबाबत फार उत्साह आणि भरपूर अपेक्षा असतात. तर दोन व्यक्तींमधील प्रेमाचे नाते सुरु करण्यापूर्वी एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या आवडीनिवडीची माहिती किंवा सुख दुखात एकमेकांना कशा पद्धतीने साथ देता येईल याचा सुद्धा विचार करणे महत्वाचे असते. अभ्यासानुसार 447 जणांवर याचा अभ्यास केला असता एकमेकांसोबत राहणे किंवा न राहण्याची काही कारणे शोधून काढण्यात आली आहेच. त्यानुसार प्रमुख म्हणजे एकमेकांच्या भावना, शारिरीक सुख आणि परिवाराची जबाबदारी आणि अर्थिक मदत ही काही कारणे रिलेशनशिप्समध्ये प्रामुख्याने येतात. मात्र नातेसंबंध संपण्यामागे एकमेकांवर अविश्वास, शारिरीक सुखामुळे असंतुष्ट, नियमित भांडणे किंवा पार्टनरची पर्सनालिटी न आवडणे ही कारणे आहेत.(जोडीदारासह नातं टिकवायचे असेल तर चुकूनही दुर्लक्षित करु नका या '5' गोष्टी)
Christmas आणि New Year या दिवशी बहुतांश रिलेशनशिप्स तुटतात,अभ्यासातून उघड Watch Video
तर सध्याच्या बदलत्या काळानुसार प्रेमाच्या नातेसंबंधाची व्याख्याच बदलून गेल्याचे दिसून येत आहे.या नव्या जगात नात्यांपेक्षा एखाद्या व्यक्तीने केलेला दिखावा त्यांना जास्त आवडतो. मात्र हे जरी सत्य नसले तरीही नात्यामधील भावना या फार महत्वाच्या असतात. तर काहीजणांना असे वाटते की, नातेसंबंध तोडून मोठ्या संख्येने आपल्या जोडीदाराच्या भावना दुखवू इच्छित नाहीत. त्याचसोबत आपल्या तुटलेल्या रिलेशनशिप्सचा परिणाम त्यांच्या जीवनावर आणि समाजातील त्यांची ओळख तसेच त्यांच्या जीवनावर होईल.