Transgender Couple Birth Baby: केरळीय ट्रान्सजेंडर जोडप्याने दिला बाळाला जन्म
Transgender Couple । PC: Instagram

केरळीय ट्रान्सजेंडर ( Kerala Transgender) जोडपे जहाद आणि जिया पावल (Zahad and Ziya Pavel) यांनी बुधवारी कोझिकोड येथील सरकारी रुग्णालयात बाळाला जन्म ( Transgender Couple Birth Bab) दिला. या जोडप्याने नुकतीच नुकतीच गर्भधारणेची घोषणा केली होती. त्यानंतर अल्पवधीतच त्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे. ट्रान्सजेंडर जोडप्याला झालेली अपत्यप्राप्तीची ही देशातील पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.  या जोडप्याच्या या कामगिरीमुळे देशभरातील ट्रान्सजेंडर समुदयाला एक नवे आयाम प्राप्त करुन दिले आहे. या जोडप्याचे आणि बाळाचे समाजाकडून कसे स्वागत होते याबाबत उत्सुकता आहे.

ट्रान्स पार्टनर्सपैकी एक असलेल्या झिया पावल यांच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रान्सजेंडर जोडप्याने बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात सिझेरियन सेक्शनद्वारे बाळाला जन्म दिला. Feminism in India नावाच्या ट्विटर हँडलवरुनही याबात ट्विट करण्यात आले आहे. टान्स पार्टनरसहीत बाळाचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती ट्रान्स पार्टनर झिया पावल आणि जहाद पावल यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, केरळ च्या Transgender Couple च्या आयुष्यात पुढल्या महिन्यात येणार बाळ; ‘First Pregnant Transman’चं फोटो शूट वायरल)

दरम्यान, देशभरात चर्चेता आणि आकर्षणाचा विषय ठरलेले हे बाळ स्त्री आहे की पुरुष याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. ही उत्सुकता अद्याप तरी कायम आहे. कारण, बाळाला जन्म दिलेल्या ट्रान्स व्यक्तीने नवजात अर्भकाच्या लिंगाची ओळख जाहीर करण्यास नकार दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, ही ओळख ते आताच जाहीर करु इच्छित नाहीत.

ट्विट

ट्रान्स पार्टनरपैकी एक असलेल्या झिया पावलने अलिकडेच इन्स्टाग्रामवर जाहीर केले होते की, ती आठ महिन्यांची गर्भवती आहे आणि लवकरच आई होणार आहे. आमचे (दोघे ट्रान्स पार्टनर) आई-बाबा होण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. आता सध्या आठ महिन्यंचा गर्भ पोटात आहे. उल्लेखनीय असे की दोन्ही ट्रान्स पार्टनर पाठिमागील वर्षभरापासून एकमेकांसोबत राहातात.