Photo Credit- X

Japan Lonely Death Crisis: जपानमध्ये वाढत्या एकाकीपणाच्या संकटाचे तीव्र प्रतिबिंब उमटत आहे. 2024 च्या पहिल्या सहामाहीत 37,000 हून अधिक लोक त्यांच्या घरात मृतावस्थेत(Japan Lonely Death) आढळले आहेत. राष्ट्रीय पोलिस एजन्सीच्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. या अहवालात असे दिसून आले आहे की यापैकी सुमारे 4,000 व्यक्ती एक महिन्याच्या कालावधीत मृत अवस्थेत आढळले. तर 130 मृतदेह एका वर्षापासून दुर्लक्षित राहिले होते. (हेही वाचा:Israeli Gaza Conflict: पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अगोदरच गाझामध्ये इस्त्रायचा हल्ला, 48 ठार )

जपानमध्ये वृद्ध लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतेक मृत्यू 65 वर्षा हून अधिक वयाचे होते. एका सरकारी गटाद्वारे मृत्यूंच्या घटनेचे पुनरावलोकन केले जाणार आहे. जपानमध्ये एकटे राहणाऱ्या आणि मृत वृद्ध नागरिकांच्या वाढत्या संख्येकडे लक्ष देण्याची तातडीची गरज ही घटना अधोरेखित करते.

अंदाजे 40% लोक जे घरी एकटे मरण पावले ते एका दिवसात सापडले. पोलिस अहवालात असे आढळून आले की मृत्यूच्या एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीनंतर सुमारे 3,939 मृतदेह सापडले होते. त्यात 130 जण शोध लागण्यापूर्वी किमान एक वर्षापासून दुर्लक्षित राहिले होते. सापडलेल्या मृतदेहांपैकी 7,498 मृतदेह 85 वर्षांच्या आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचे होते. त्यानंतर 5,920 मृतदेह 75-79 वयोगटातील लोकांचे होते. सापडलेल्या मृतदेहांपैकी 70 ते 74 वयोगटातील लोकांचे 5,635 मृतदेह होते.

2024 च्या पहिल्या सहामाहीत  37,000 मृत्यू

या वर्षाच्या सुरुवातीला, जपानी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटी रिसर्चने सांगितले की, 2050 पर्यंत एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांची संख्या 10.8 मिलीयनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्याच वर्षी एकल व्यक्ती कुटुंबांची एकूण संख्या 23.3 मिलीयनपर्यंत  जाण्याचा अंदाज आहे.