Divorce | Pixabay.com

Viral story: लग्न म्हणजे स्वर्गात बांधल्या जाणाऱ्या गाठी. लग्नानंतर दोन जीवांची नवी सुरुवात होत असते. नव्या सुरुवातीत रुसवे फुगवे तर होतात. तर काही वेळी क्षुल्लक कारणांवरून दोघांंमध्ये भांडण होत असते. हेच भांडण अगदी टोकाला येवून थांबते. घटस्फोटासाठी आजवर अनेक कारण आपणं पाहिली आहे, घरगुती कारणांपासून ते मारामारी असं अनेक कारणांमुळे तर फार फारतर नवरा प्रेम करत नाही किंवा दुसऱ्या अफ्रेर्स मुळे घटस्फोट होतो. दरम्यान मुंबईतील एका महिलेचा अजब कारोबार पाहायला मिळाला आहे.या प्रकरणात एका वकिलने खुलासा केला आहे. सोशल मीडियावर तीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तीनं घटस्फोटासाठी महिलांनी मागणी घातल्या होती याची कारणे सांगितली. पण या घटस्फोटामागील कारण ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल,

महिला वकीलाचे नाव तान्या अपाचू कौल असे आहे. या वकिलकडे एका महिलेने अजब घटस्फोटासाठी मागणी केली. महिलेने तक्रार केली की, तिचा नवरा तीच्यावर खुप प्रेम करतो. भांडण करत नाही, या कारणास्तव हीनं घटस्फोटाचा विचार केला आहे. तीनं शेअर केलेली रिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रीलच्या कॅप्शनमध्ये महिला वकीलाने लिहिले आहे की, तर लग्नच का करायचं? यावर कमेंटही गमतीशीर आल्या आहेत.

एका युजर्सनी लिहले आहे की, आज काल लग्नापूर्वी समुपदेशन करणे खुप महत्त्वाचे आहे. पुरुषांची तक्रार आहे की, आजकाल पत्नी त्यांचे ऐकत नाहीत. दुसरीकडे महिलांची तक्रार आहे की, पुरुष त्यांच्यावर प्रेम करत नाही.