स्वप्नात गाय दिसणे हे कोणत्या गोष्टीचे संकेत देतात? जाणून घ्या या मागील नेमका अर्थ 
Cow (Photo Credits: (Pixabay) Representational Image Only

आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल आपल्याला आधीपासूनच संकेत मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळे गोष्टींबद्दल योग्य अर्थ आधीच कळला तर होणारी मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते. तर झोपेच्या वेळी जर तुम्हाला एखादे स्वप्न पडले तर त्याचा नेमका अर्थ काय याचा विचार तुम्ही करु लागता. त्यामुळे स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टींबद्दल दुर्लक्ष करु नये. त्यामागील अर्थ समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केल्यास त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होऊ शकतो.(Sand Boa Snake: काळ्या बाजारात सॅंड बोआ सापाची सर्वाधिक मागणी; जाणून घ्या तस्करीचे कारण)

शास्रानुसार तुम्हाला स्वप्नात गाय दिसल्यास याचे अर्थ गंभीर असतात. गाईला अति पवित्र मानले गेले आहे. शास्रात कामधेनू गाईचे वर्णन करण्यात आलेले आहे. पौराणिक कथेनुसार गाईची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती. समुद्र मंथन देवता आणि असुरांच्या मध्ये झाले होते. समुद्र मंथनातून अमृत कलशासह अन्य 14 रत्न प्राप्त झाले होते. ज्यामधील एक कामधेनु गाय होती. हिंदू धर्मात गाईला पवित्र मानले जाते. पशुधनात गाईला विशेष महत्व देण्यात आले आहे.

स्वप्नात गाय दिसणे हे शास्रानुसार अत्यंत शुभ आहे. कारण यामागील काही खास संकेत असून तुम्हाला आयुष्यात सुख प्राप्ति होणार असते. त्याचसोबत सफेद रंगाची गाय स्वप्नात दिसल्यास तुम्हाला सफेद रंगासंबंधित गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. जी लोक सफेद रंगाशी निगडीत वस्तुंचा व्यापार करतात त्यांना विशेष लाभ होतो.(World Snake Day 2021: जगातील 'हे' 5 विषारी साप जर चावले तर अवघ्या काही मिनिटात जाऊ शकतो जीव)

त्याचसोबत जर गाईसह तिचे वासरु दिसल्यास ते सुद्धा शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, धनासंबंधित गोष्टींमध्ये वाढ होणार आहे. ही एक शुभ घटना असल्याचे मानले जाते. सावन महिन्यात अशा पद्धतीचे स्वप्न जर पडल्यासते त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होऊ शकतो.