तुमच्या रक्त गटानुसार ठरवा डाइट प्लॅन, तंदुरुस्त राहण्यासाठी 'या' पद्धतीने निवडा तुमचे हेल्दी खाणं
Fruits (Photo Credits: Facebook)

तंदुरुस्त आरोग्य राहण्यासाठी योग्य डाइट प्लॅन असणे अत्यावश्यक आहे. खाण्यापिण्यामध्ये पौष्टिक आहारांचे ही संतुलन असावे असे सांगितले आहे. त्यामुळेच लोकांना खाण्यापिण्या संदर्भात योग्य माहिती असावी याच उद्देशाने प्रत्येक वर्षी वर्ल्ड फूड डे साजरा करण्यात येतो. तर तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या रक्त गटानुसार खाण्यापिण्याच्या गोष्टीं ठरवल्यास ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि प्राकृतिक स्थिती वेगळी असते. त्यानुसार व्यक्तीचा रक्तगट सुद्धा वेगवेगळा असतो. तर रक्तगट चार प्रकारचे असून A,B,AB आणि O या पद्धतीचे असतात. तुम्हाला तुमच्या रक्तगटाबाबत अधिक माहिती करुन घ्यायचे असल्यास डॉक्टरांना भेटावे.

-O रक्तगटासाठी प्रोटिन उत्तम

ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना हाय प्रोटिनयुक्त आहार घ्यावा. डाळ, मीट, मासे, फळ यांसारखे पदार्थ डाइटमध्ये सहभागी करावे. तुमच्या खाण्यात धान्य-तृणधान्यांचा सुद्धा समावेश असावा.

-A रक्तगट असलेल्या व्यक्तींसाठी उत्तम डाइट

अ रक्तगट असलेल्या व्यक्तींना आहाराबाबत विशेष काळजी घ्यावी. त्यांना हिरव्या पालेभाज्यांसह टोफू, सी फूड आणि डाळींवर जास्त भर द्यावा. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असल्यास त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, डेअरी प्रोडक्ट्स, मका आणि सी फूड सर्वात उत्तम ऑप्शन आहे. मात्र चिकट-मटणाचे जास्त सेवन करु नये.

-B रक्तगट असलेल्या व्यक्तींसाठी उत्तम डाइट

जर तुमचा रक्तगट बी असल्यास अशा व्यक्तींनी हिरव्या पालेभाज्या, फळ, फिश, मटण आणि चिकन खाऊ शकतात.(World Food Day 2019: मुंबई, पुणे शहरात 'या' NGO ला उरलेलं अन्न फेकण्याऐवजी दान करून भूक भागवण्याचं पुण्य मिळवा!)

-AB रक्तगट असलेल्या व्यक्तींसाठी उत्तम डाइट

AB रक्तगट असलेल्या व्यक्ती क्वचितच आढळतात. या रक्तगटामधील व्यक्तींनी खाण्यापिण्याबाबत अधिक काळजी घ्यावी. फळ आणि हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात.

तर रक्तगटानुसार डाइट केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच कोणत्याही गोष्टींबाबत डाइट करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.