Winter Health Tips: थंडीमध्ये ' या' नियमांचे पालन करुन बनवा तुमचे शरीर अधिक बळकट आणि ताकदवान  
Photo Credit: pixabay

थंडीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी केल्या तर तुम्ही बनवू शकता तुमचे शरीर बळकट आणि ताकदवर बनवू शकता.तुम्हाला माहीतच असेल की थंडीच्या दिवसात दिवस कमी आणि रात्र मोठी असते म्हणजेच आपल्या शरीरावर चंद्राचा प्रभाव आपल्यावर जास्त असते आणि आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील बळ हे चंद्रवार निर्भर असते.त्याच अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि उपयोग सांगणार आहोत जे केल्याने तुमचे शरीराचे सामर्थ्य वाढेल तुम्ही अधिक शक्तिवान आणि बळकट व्हाल .(Benefits Of Jump Rope Exercise: रोज दोरी उड्या मारल्याने शरीराला  होतात 'हे' महत्वाचे फायदे)

व्यायाम करा 

थंडीत घाम कमी येतो, हवा सुसह्य़ असते म्हणून या दिवसांत व्यायाम सुरू करणे बरे वाटते. व्यायामांनी शरीराची व स्नायूंची क्षमता वाढते, ‘स्टॅमिना’ सुधारतो, शरीराला प्राणवायू पुरेशा प्रमाणात मिळण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. नियमित व्यायामामुळे कोणताही आजार वा अपघात यांना तोंड देण्याची शरीराची क्षमता वाढते आणि एकूणच आरोग्य सुधारते.

चांगल्या पदार्थांचे सेवन करा 

थंडीमध्ये आपल्याला जास्त भूक लागते त्यामुळे या ऋतुमध्ये आपण नेहमीपेक्षा जास्त खातो.अशावेळी जंक फ़ूड ला प्राधान्य न देता अशा गोष्टी खा ज्या तुमच्या शरीरासाठी पौष्टिक असतील.जसे दूध, फळे, पालेभाज्या , प्रतिनेयुक्त पदार्थ यांचे सेवन जास्त करा.जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर जास्त आहार करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल.

तेल मालिश करा 

थंडीच्या ऋतुमध्ये आपल्या शरीरातील वात वाढते.तसेच आपल्या शरीराची त्वचा खुप ड्राय होत.अशा वेळी तेलाने मालिश केल्याने फायदा होतो.आयुर्वेदानुसार त्वचा ही पंचमहाभुतांमधील वायूपासून बनली आहे असे मानले जाते. म्हणजेच त्वचेत वायूचे अधिक्य असल्याचे मानले जाते. वायू कमी करण्यासाठी स्नेह, स्निग्धता महत्त्वाची. त्यामुळे शरीराला हिवाळ्यात तेल लावणे गरजेचे आहे.

दररोज अंघोळ करा 

बऱ्याचदा आपल्याला थंडीच्या ऋतुमध्ये अंघोळ करण्याची इच्छा नसते.थांडीमध्ये अंघोळ करण्यास आपण आळस करतो.मात्र तसे करू नका. अंधोळ केल्यानंतर रक्त संचार प्रथम उत्तेजित होतो, पण काही वेळातच तो मंद पडतो. थंड पाण्याने अंधोळ केल्याने रक्त संचार प्रथम मंद पडतो आणि नंतर उत्तेजीत होतो, हे लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार थंड पाणी मेंदूला थंड करण्यात मदत करतो. या शिवाय शारीरिक सौंदर्य टीकून राहते. अंघोळ केल्याने तुमचा दिवसभरातील थकवा दूर होतो. तुम्हांला चांगली झोप लागतो. अंघोळीच्या पाण्यात इसेंस ऑईल वापरल्यास झोप अजून चांगली येते. आपल्या शरिरात दोन प्रकारे फॅट असतात. व्हाईट फॅट हे आपल्या शरिरासाठी घातक असते. दुसरे ब्राऊन फॅट आपल्या शरिरासाठी चांगले असते. आपल्या भोजनातून तयार होते. ते व्हाइट फॅट असते. हे फॅट आपल्या शरिराच्या एका भागात गोळा होता. एक्पर्टने सांगितल्यानुसार आपण थंड आणि गरम पाण्याने अंघोळ केल्यावर कॅलरी बर्न होतात. त्यामुळे आपले वजन आणि चरबी कमी होते.

चूर्णाचे सेवन करा

असे अनेक चूर्ण आहेत जे खास थंडीमध्ये खाल्याने आपल्या शरीराला फायदा होतो.जसे च्यवनप्राशन किंवा आवळ्याचे चूर्ण.

((टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)