सध्याचे बदलते राहणीमान पाहता लहानांपासून ते वयस्कर लोकांचे वजन वाढलेले दिसून येते. कारण वाढत्या वजनामागील विविध कारणे असू शकतात. परंतु लहान मुलांमधील वाढते वजन किंवा अतिलठ्ठपणा ही समस्या काही वेळेस त्रासदायक ठरु शकते. एवढेच नाही लहान मुलाचे वजन त्याच्या वयोमानानुसार अतिप्रमाणात असल्यास त्याला वाढत्या काळात काही आजारांचा सामना करावा लागू शकतो.
तर अमेरिकेच्या एका संशोधकांनी लहान मुलांमधील वजन वाढण्यामागील काही कारणे स्पष्ट केली आहेत. त्यामध्ये जी मुले एकटे राहतात, आजूबाजूला कोणीही राहत नाही किंवा शेजाऱ्यांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते अशांमध्ये वजन वाढण्याची शक्यता फार असते.
वाढत्या वजनापासून बचाव करण्यासाठी करा हे काम:
लहान मुलांते वाढते वजन पाहता त्यांनी घराबाहेर जाऊन मैदानी खेळ खेळणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत जर लहान मुले घरातून बाहेरच पडत नसल्यास त्याचा आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. फक्त घरात बसून बसून ही वजन वाढण्याची शक्यता असते.
एकटे राहण्याने वजन वाढते:
एका अभ्यासामधून असे समोर आले आहे की, 10 वर्षापर्यंतची जी मुले एकटी राहतात त्यांच्यामध्ये वजन वाढण्याची शक्यता 16 टक्के अधिक असते. तर 11 ते 19 वर्षातील मुले जर एकटी राहत असल्यास त्यांच्यामध्ये वजन वाढण्याची शक्यता 29 टक्क्यांपेक्षा जास्त असते.(लग्नानंतर 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास व्हाल लठ्ठ)
परंतु संशोधकांनी असे म्हटले आहे की, लहान मुलांच्या संपूर्ण विकासासाठी शारीरिक व्यायामाची गरज आहे. त्यामुळे लहान वयातच मैदानी खेळाची सवय लागल्यास वाढत्या वयासोबत वजन वाढण्याची शक्यता सुद्धा कमी होते. खेळल्यामुळे शारीरिक रुपाने लहान मुले सदृढ बनतात असे मानले जाते.